News Flash

जेव्हा शिवानीने दिली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी भेट

मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही लक्ष्मीकांत बेर्डे साऱ्यांच्या स्मरणात आहेत. 

शिवानी सुर्वे

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकरांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या साऱ्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. वूट अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिवानी सुर्वे लक्ष्‍मीकांत बेर्डे यांच्‍या घरी भेट देण्‍याचा तिचा अनुभव सांगताना दिसणार आहे.

शिवानी आणि आरोह लक्ष्‍मीकांत यांच्‍याबद्दल बोलत आहेत. शिवानी सांगते, ”मी प्रिया ताईसोबत एका मालिकेचं शूटिंग करत होती. मालिकेत माझ्या सासूबाईंची भूमिका त्या साकारत होत्या. एके दिवशी शूट संपल्यावर त्या मला म्हणाल्या की चल माझ्या घरी. हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी आईला फोन करुन सांगितलं की मी घरी येत नाहीये.”

आणखी वाचा : हा अभिनेता होता करीनाचा क्रश; रिअॅलिटी शोमध्ये सांगितली ‘दिल की बात’

ती पुढे सांगते, ”सकाळी साडेसहा वाजता मला शूटिंगसाठी जायचं होतं. त्यामुळे त्यांच्या घरी मला फक्त चार-पाच तासच झोपायला मिळणार होते. पण मला रात्रभर झोप लागलीच नाही. मी फक्त लक्ष्मीकांत यांना मिळालेल्या पुरस्कारांकडे बघत राहिले.”

लक्ष्मीकांत बेर्डे यांची सिनेमांतील कारकीर्द कोणत्याच कलाकाराला किंवा प्रेक्षकाला विसरता येणार नाही. अशा दिग्गज कलाकाराच्या घरी भेट देण्याची संधी मिळणं एखाद्या कलाकारासाठी पर्वणीच ठरेल. सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 4:20 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve telling experience when she went to visit laxmikant berde home ssv 92
Next Stories
1 अखेर ‘ढगाला लागली…’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडीओ
2 हा अभिनेता होता करीनाचा क्रश; रिअॅलिटी शोमध्ये सांगितली ‘दिल की बात’
3 #WarTrailor : हृतिक-टायगरची खडाजंगी; हॉलिवूडला टक्कर देणारे जबरदस्त अॅक्शन सीन्स
Just Now!
X