News Flash

Bigg Boss Marathi 2 : सहापैकी ‘हे’ दोन स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर

'बिग बॉस मराठी २'चा महाअंतिम सोहळा रंगत आहे आणि बहुचर्चित रिअॅलिटी शोचा विजेता कोण ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘बिग बॉस मराठी २’चा महाअंतिम सोहळा रंगत आहे आणि बहुचर्चित रिअॅलिटी शोचा विजेता कोण ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे सहा स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते पण त्यापैकी दोन जण घराबाहेर पडले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार किशोरी शहाणे व आरोह वेलणकर हे दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आता चार जणांमध्ये चुरस आहे.

आरोह वेलणकरने या शोमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. तर किशोरीताईंनी सर्वांत आधी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. आपल्या शांत खेळीमुळे त्या चर्चेत राहिल्या. भांडणं, वादविवाद न करता किशोरीताई अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर आरोहची फॅन फॉलोईंग जास्त आहे. त्यामुळे त्याला प्रेक्षकांकडून भरभरून मतं मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता हे दोघं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. आता नेहा, शिवानी, शिव व वीणा या चौघांपैकी कोण विजेता ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘बिग बॉस’ मराठी सिझन २ ची ट्रॉफी कोण पटकावणार हे येत्या काही वेळातच प्रेक्षकांना समजणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 8:06 pm

Web Title: bigg boss marathi 2 these two contestants eliminated from the finale ssv 92
Next Stories
1 मूर्तीच आपलं घर निवडते – श्रेया बुगडे
2 “ही झाडे आमची, नाही कुणाच्या बापाची”, आरेचे जंगल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरचा नारा
3 धर्मेंद्र यांनी फोटो शेअर केलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Just Now!
X