Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरू असलेलं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सर्वाधिक वादग्रस्त ठरलं. ज्यामध्ये नंदकिशोर हुकूमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहे. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेनं काल हुकूमशहाविरोधात बंड पुकारला. हुकूमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहाचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहाच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहाच्या विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे असे काही कार्य बिग बॉसकडून प्रजेला देण्यात आले होते. हे कार्य पूर्ण करून नंदकिशोरची हुकूमशाही संपुष्टात आणण्यात प्रजा यशस्वी ठरली. त्यामुळेच ‘द ग्रेट डिक्टेटर’ या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याची चढाओढ ही विजयासाठीच होत आहे. आता जसजसे स्पर्धेचे दिवस कमी होत आहेच तसतसा हा प्रवास आणखी अवघड होत जाणार आहे. आता बिग बॉस कॅप्टनसीच्या उमेदवारांना ‘चाल–वाटचाल’ हे कॅप्टनसीचे कार्य आज सोपवणार आहे. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार असणार आहेत. या टास्कदरम्यान मेघा आणि रेशममध्ये वाद होणार आहे. तसंच सई आणि रेशम यांच्यात देखील बाचाबाची होणार आहे.

वाचा : प्रेमात असताना पाणीसुद्धा गोड लागतं- रणबीर कपूर

बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल.