News Flash

Bigg boss: आज कॅप्टनशीप कोण जिंकणार? रुपाली की वीणा

रुपालीला आणि वीणाला कोणते सदस्य पाठींबा देणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत

नुकताच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी सुर्वेची एन्ट्री झाली आहे. शिवानीच्या घरामध्ये येण्याने नेहा आणि माधवला आता थोडा धीर मिळाला आहे. WEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकरांनी वीणा आणि रुपालीची चांगलीच शाळा घेतली. परंतु या आठवड्यात एकाही सदस्याल्या घराबाहेर काढण्यात आले नाही. ही सदस्यांसाठी आनंदाची बाब होती. त्यानंतर दरसोमवारी येणारा कॅप्टनसी टास्क आज घरात पार पडणार आहे. घराच्या कॅप्टनसाठी वीणा आणि रुपाली या दोघी खास मैत्रीणी ऐकमेकींसमोर उभ्या राहणार आहेत.

आज घरामध्ये रुपाली आणि वीणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. घराचा कॅप्टन बनणे हि खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन बनलेल्या सदस्याला आठवड्याची इम्युनिटी देखील मिळते. त्यामुळे हा टास्क जिंकून कॅप्टन बनणे हे प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचे असते. आता या आठवड्याच्या कॅप्टनसी टास्कमध्ये रुपाली आणि वीणामध्ये कोण जिंकणार हे बघणे रंजक असणार आहे.

या कॅप्टनसी कार्यामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी त्यांच्या टीममधील एका सदस्याला साष्टांग नमस्कार घालावे लागणार आहे. आता रुपाली आणि वीणा कोणत्या सदस्याला साष्टांग नमस्कार घालण्यासाठी तयार करणार हे पाहण्यासाठी सर्वांची आतुराता वाढली आहे. दरम्यान रुपालीला आणि वीणाला कोणते सदस्य पाठींबा देणार हे पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच घराची नवी कॅप्टन कोण होणार असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 6:47 pm

Web Title: bigg boss marathi captaincy task between veena and rupali avb 95
Next Stories
1 ‘ओ साकी साकी’च्या रिक्रिएट व्हर्जनवर कोयना मित्रा भडकली
2 प्रोस्थेटिक मेकअपबाबत बिग बींनी व्यक्त केली चिंता
3 हेमा मालिनींचा झाडू मारण्याचा व्हिडीओ व्हायरल; धर्मेंद्र यांची भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X