मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या या शोचं सूत्रसंचालन यावेळीदेखील महेश मांजरेकर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची या शोविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. मात्र प्रेक्षकांना सर्वात मोठी उत्सुकता लागली आहे ती बिग बॉसच्या घराची. यावेळी बिग बॉसचं नवं घरं कसं असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे पहिल्या पर्वाप्रमाणेच यावेळीदेखील बिग बॉसचं घरं हटके आणि एक नवीन थीम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये विविध क्षेत्रातील १५ लोकप्रिय व्यक्ती घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईझ असणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉसचे घर. यावेळी बिग बॉसच्या घराला भव्य दिव्य वाड्याचं स्वरुप देण्यात आलं आहे. हा सेट तब्बल १४ हजार चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये उभारण्यात आला आहे. या घराला आलिशान अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले यात मध्यभागी मोठे अंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील.

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारे १५ कलाकार त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच १०० दिवस एका अनोळखी जागी ७५ कॅमेरांच्या नजरकैदेत रहाणार आहेत. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिअॅलिटी शोचं प्रस्तुतीकरण रिनतर्फे करण्यात येणार असून विशेष प्रायोजक पुराणिक आणि Helo App यांचा सहभाग असणार आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर. मागच्या पर्वात आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली तेच महेश मांजरेकर याही पर्वात सूत्रसंचालकाची महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मागच्या पर्वात त्यांनी ज्या प्रकारे घरातील सदस्यांना कधी मित्र बनून, तर कधी गुरु बनून, तर कधी मार्गदर्शक बनून तर कधी घरातील एक मोठी व्यक्ती बनून मार्गदर्शन केलं,प्रसंगी परखड मत व्यक्त करत त्यांचे कानही टोचले. चुकलेल्यांना समज दिली, खोटेपणाचे मुखवटे उतरवण्याचं काम केलं हे सर्व काही आता याही पर्वात बघायला मिळणार आहे. एक उत्तम अभिनेता, एक कौशल्यपूर्ण दिग्दर्शक यामुळे महेश मांजरेकर प्रत्येक मराठी प्रेक्षकांना आपलेसे वाटतात आणि त्यांच्या याच स्वभावगुणांमुळे त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती सुद्धा वाटते त्यामुळे याहीवर्षी ते घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांवरही आपल्या दमदार सूत्रसंचालनाची छाप सोडतील हे निश्चित. एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित बिग बॉस मराठी सिझन 2 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे २६ मे रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूण पिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेसदेखील VOOT वर कार्यक्रमाचे मूळ भाग, अनदेखा आणि प्रक्षेपित न केलेले भाग प्रेक्षक कधीही बघू शकतात.

बिग बॉसची नजर तुमच्यावर देखील आहे तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन दुसरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि चुकून राहलंच तर विसीट करा http://www.colorsmarathi.com … तुम्हाला आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील याचे अपडेट्स मिळू शकतात @Colorsmarathi and @BiggBossMarathi त्यासाठी हॅशटॅग #BiggBossMarathi2 | इंस्टाग्राम युसर्सना एक्सक्लूसिव्ह माहिती मिळू शकते @Colorsmarathiofficial यावर.