08 December 2019

News Flash

Bigg Boss Marathi : वीणाने केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा शिवानी विचारणार जाब

या प्रश्नावर आता वीणा शिवानीला काय उत्तर देणार ?

काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरातून आजारपणाचं कारण देत घराबाहेर पडलेली स्पर्धक शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा घरामध्ये एण्ट्री झाली आहे. नुकत्याच झालेल्या विकेंडच्या डावामध्ये ती चाहत्यांसमोर आली. शिवानीच्या एण्ट्रीनंतर नेहा, माधव, अभिजीत यांना विशेष आनंद झाला असून घरातील काही सदस्यांना मात्र तिचं पुन्हा येणं पटलेलं दिसत नाही. त्यातच आता शिवानी वीणाला एका गोष्टीचा जाब विचारणार आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात शिवानी आणि पराग घरामध्ये असताना या दोघांमध्ये प्रचंड मतभेद झाले होते. याच दरम्यान, एकदा वीणा आणि परागमध्ये शिवानीबद्दल चर्चा सुरु होती. यावेळी ‘आता मी हिला नादी लावतो’, असं पराग वीणाला म्हणाला होता. त्यावर ‘हो ती आहेच तशी’, असं उत्तर वीणाने परागला दिलं होतं. वीणाच्या याच वक्तव्यावर शिवानी आता तिला जाब विचारणार आहे. तशी आहे, म्हणजे नक्की कशी आहे? असा प्रश्न शिवानी वीणाला विचारणार आहे.

शिवानीने विचारलेल्या या प्रश्नावर आता वीणा तिला उत्तर देणार आहे. त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष आता वीणाच्या उत्तराकडे लागलं आहे.

 

First Published on July 14, 2019 3:19 pm

Web Title: bigg boss marathi shivani ask question veena ssj 93
Just Now!
X