News Flash

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेला सोडायचं बिग बॉसचं घर ?

बिग बॉसने अद्याप तरी शिवानीच्या विनंतीवर निर्णय दिलेला नाही

शिवानी सुर्वे

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील शिवानी सुर्वे हे नाव आता सर्व परिचित झालं आहे. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी आता शिवानी ओळखली जाऊ लागली आहे. मात्र घरातल्या या स्ट्राँगक स्पर्धकाला बिग बॉसचं घरं सोडायचं आहे. गुरुवारी झालेल्या टास्कदरम्यान तिने तिची ही इच्छा व्यक्त केली आहे.

सतत चर्चेत राहणाऱ्या शिवानीने गुरुवारी घरातील सर्व सदस्यांची माफी मागितली असून सोबतच तिने बिग बॉसला घरातून बाहेर पडण्याची विनंती केली आहे. मात्र शिवानीने केलेल्या या विनंतीवर बिग बॉसने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसला विनंती करताना दिसणार आहे. त्यामुळे निदान आता तरी बिग बॉस या विनंतीकडे लक्ष देऊन त्यांचा निर्णय देतील का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात काल काय घडले ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये काल घरातील सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली. दिंगबर नाईक यांना टास्कमध्ये शिक्षक असलेल्या टीमने पास केले. वैशाली म्हाडेने संगीत क्लासमध्ये सुंदर अशी गाणी तिच्या मधुर आवाजात ऐकवली. तर परागच्या तासात ऐकवलेल्या ‘एक प्यार का नग्मा है’ या गाण्यामुळे सगळे सदस्य भावूक झाले. अभिजीत केळकर याने बिग बॉसला नेहा विषयी तक्रार केली, काही सदस्य करत असलेल्या कटकटीमुळे बाकीचे सदस्य टास्क हवा तसा खेळता येत नाही. शिक्षक झालेल्या टीमने काल विद्यार्थी बनून BB विद्यालयात बराच दंगा केला. अभिजीत बिचुकले यांना इंग्लिश शिकवायची जबाबदारी सोपवली होती आणि या क्लासमध्ये वीणा आणि परागने बिचुकले यांना त्यांच्या इंग्लिशवरून बरेच चिडवले. वीणाला काल अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या क्लास मध्ये दंगा केल्याने तर नेहाने परागला नापास केले. आज टास्कमध्ये काय होणार ? कोण नापास आणि कोण पास होणार ? आणि कोण घराचा कॅप्टन होणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 1:18 pm

Web Title: bigg boss maratrhi 2 shivani surve left bigg boss house ssj 93
Next Stories
1 मुंबई सागा : अंडरवर्ल्डचे रहस्य उलगडणार तगडी स्टारकास्ट
2 ‘वेदनम’च्या रिमेकमध्ये दिसणार जॉन अब्राहम?
3 ‘झुंड’साठी असा जुळून आला बिग बी व नागराज मंजुळेंचा योग
Just Now!
X