कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बिग बॉस ११ या रिअॅलिटी शोची अंतिम फेरी आता फक्त १० दिवस दूर आहे. शोमधून बाहेर पडण्यासाठी लव त्याही, हिना खान, विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे हे ४ स्पर्धक नॉमिनेट झाले. गेल्या १० सिझनमझ्ये जे करण्यात आले नव्हते असे नवे प्रयोग ११ व्या सिझनमध्ये करण्यात येत आहेत. बिग बॉसने चारही स्पर्धकांना लाइव्ह वोटिंगसाठी प्रेक्षकांमध्येच नेण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील इनॉर्बिट मॉलमध्ये नेण्यात आले होते. यावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना वाचवण्यासाठी वोटींग केले.

https://twitter.com/TheRealityShows/status/948934011056828416

आयोजकांना सुरूवातीला या उपक्रमातून चांगले मनोरंजन होईल असे वाटले होते. पण स्पर्धकांना पाहायला आलेल्या प्रेक्षकांची गर्दी एवढी जास्त होती की त्यांना आवर घालताना आयोजकांच्या नाकी नऊ आले होते. याचदरम्यान स्पर्धक हिना खानसोबत गैरवर्तन करण्यात आले. रिपोर्टनुसार, काही लोकांनी हिनाचे केस ओढले.

हिनाने बिग बॉसच्या घरात प्रत्येकवेळा स्वतःला सिद्ध केले आहे. चाहत्यांचा तिच्यासाठी असणाऱ्या पाठिंब्यामुळे अनेकदा ती नॉमिनेशमधून वाचलीही आहे. पण तरीही घरातील तिच्या वागणुकीमुळे प्रेक्षकांमध्ये तिची प्रतिमा फारच नकारात्मक झाली आहे.

बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये सुरूवातीला पाच स्पर्धक असे होते जे सेलिब्रिटी नव्हते. या पाच स्पर्धकांपैकी फक्त लवच आतापर्यंत शोमध्ये टिकून राहिला आहे. बिग बॉस ११ चा मुकूट जिंकण्यासाठी हिना खान, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण आता यातील कोण जिंकणार हे येत्या १० दिवसांमध्ये कळेलच.