बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. दरम्यान या बिहार निवडणूकीवर अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेत अब की बारचा शेवट झाला आज बिहारची वेळ आहे, असं म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते रोखठोकपणे आपली मतं मांडतात. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणूकीवर भाष्य केलं. “अमेरिकेत अब की बारचा शेवट झाला. आता बिहारची वेळ आली आहे. मी आशा करतोय की आता माझ्या देशात पुन्हा एकदा सुधारणा होण्यास सुरुवात होईल.” अशा आशयाचं ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – तैमुर वडिलांसोबत करतोय शेती; छोट्या नवाबचे फोटो पाहून व्हाल थक्क

महाआघाडी-एनडीए, कोण किती जांगावर आघाडीवर?

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ४२, जदयू ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ व डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोजपा दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.