06 August 2020

News Flash

करीनाने प्रियांकाला दिल्या ‘बर्थ डे’ च्या हटके शुभेच्छा, शेअर केला खास फोटो

शुभेच्छा संदेशात करीना म्हणाली...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने प्रियांकाला तिचे चाहते, निकटवर्तीयांबरोबर बॉलिवूडमधुनही मोठया प्रमाणावर शुभेच्छा मिळत आहेत. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये फक्त प्रतिभा संपन्नतेसाठीच ओळखली जात नाही, तर तिचे आपल्या सहकलाकारांबरोबरही चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे आज वाढदिवसाच्या प्रसंगी तिला बॉलिवूडमधुनही मोठया प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरनेही पीसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रियांकासोबतचा फोटो शेअर करुन खास शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडमध्ये काम करताना अभिनेत्रींमध्ये मैत्री कमी आणि स्पर्धा जास्त पाहायला मिळते. पण प्रियांका आणि करीनाचे नाते याला अपवाद आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर प्रियांकासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये प्रियांका स्टायलिश पिवळया रंगाच्या आउटफिटमध्ये आहे तर करीनाने शिमरी मरुन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ‘कॉफी विद करण’ कार्यक्रमात दोघी एकत्र सहभागी झाल्या होत्या. त्यावेळचा दोघींचा हा फोटो आहे. या शो मध्ये करणची फिरकी घेण्याबरोबरच दोघींनी खूप मस्ती, धमाल केली होती. त्यामुळे हा फोटो दोघींसाठी खास आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने पीसीला शुभेच्छा देताना करीनाने हा फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

Happy birthday @priyankachopra… May you continue to inspire the world Hugs from across the globe…

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

‘हॅप्पी बर्थ डे प्रियांका चोप्रा…तू जगाला अशीच प्रेरणा देत राहा’ असा संदेश त्या फोटोखाली लिहिला आहे. या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर दोघांनी एकत्र काम केले आहे. ‘ऐतराज’ आणि ‘डॉन’ या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केले आहे. रील लाइफप्रमाणे रीयल लाइफमध्येही दोघींमध्ये चांगले, मैत्रीचे नाते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 4:05 pm

Web Title: birthday girl priyanka chopra wishes by kareena kapoor dmp 82
Next Stories
1 ‘स्वामिनी’ मालिकेमध्ये मोठ्या रमेच्या पावलांनी उजळणार शनिवारवाडा !
2 स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…
3 चित्रपटगृह बंद! आता ‘ओटीटी’वर होणार एकाच दिवशी ४ चित्रपटांची टक्कर
Just Now!
X