News Flash

‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला होता वाद

वाढदिवशी जाणून घेऊया जेठालाल विषयी खास गोष्टी..

dilip joshi, munmun dutta,

टीव्हीवर सर्वाधिक काळ चाललेली विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेचे व मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे जगभरात चाहते आहेत. यामध्ये जेठालाल (दिलीप जोशी) आणि ग्लॅमरस बबिता (मुनमुन दत्ता) यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. आज २६ मे रोजी दिलीप जोशी यांचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया दिलीप जोशी यांच्या विषयी काही खास गोष्टी. पडद्यावर जेठालाल नेहमीच बबिताच्या मागे असल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला माहित आहे का, ऑफस्क्रीन या दोघांमध्ये एकदा चांगलीच बाचाबाची झाली होती.

२०१७ मधील ही घटना आहे. मालिकेच्या सेटवरच दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्यात वाद झाला. दिलीप जोशी यांचे काही मित्र त्यांना भेटायला सेटवर आले होते. त्यावेळी त्यांनी सेटवरील प्रत्येक कलाकारासोबत फोटो काढले. मुनमुनसोबतही त्यांना फोटो काढायचे होते. मात्र मुनमुनने फोटो काढण्यास नकार दिला आणि जेठालालचे चाहते नाराज झाले. मालिकेच्या टीमबद्दल तुम्ही चुकीची प्रतिमा तयार करत आहात, असं दिलीप जोशी मुनमुनला म्हणाले. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, छोट्या छोट्या गोष्टींसाठी अहंकार दाखवणं सोडून द्या, असंही दिलीप जोशी मुनमुनला म्हणाले होते. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला होता.

आणखी वाचा: ‘तारक मेहता…’मधील जेठालालापासून ते बबितापर्यंत जाणून घ्या कलाकारांची एकूण संपत्ती

नंतर काही दिवसांनी दिलीप जोशी व मुनमुन यांनी त्यांच्यातील मतभेद दूर केले. ‘तारक मेहता..’ या मालिकेचे जगभरात चाहते आहेत. जवळपास गेल्या वर्षांपासून १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांना मनावर एक विशेष छाप सोडली आहे. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही या मालिकेचा प्रेक्षकांना कंटाळा येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2021 10:43 am

Web Title: birthday special did you know dilip joshi aka jethalal had once lashed out avb 95
Next Stories
1 अरुणाचल प्रदेशच्या आमदाराला ‘चायनीज’ म्हणणाऱ्या यूट्यूबरला सेलिब्रिटींनी सुनावलं!
2 “मी मुलांना जन्म देणारी मशीन नाही…”, प्रेग्नेंसीच्या ‘त्या’ प्रश्नावर विद्या बालनचं धक्कादायक उत्तर
3 “त्यांची एवढी हिंमत कशी?”; तापसीनंतर उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापली
Just Now!
X