उत्तम संवाद कौशल्य आणि अभिनय याच्या जोरावर अनेकांच्या मनात घर करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे ज्युनिअर एनटीआर. त्याचे लाखो चाहते आहेत. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज २० मे रोजी त्याचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया ज्युनिअर एनटीआर या नावाने लोकप्रिय असलेल्या या कलाकाराचं खरं नाव नेमकं काय आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ मध्ये हैदराबादमध्ये झाला. दाक्षिणात्य सुपरस्टार एन.टी. रामाराव यांता नातू असलेल्या या अभिनेत्याने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मर्षि विश्वामित्र’ या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

ज्युनिअर एनटीआरने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच एन.टी. रामा राव यांच्या चित्रपटातून अभिनेता म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे तो एन.टी. रामा राव यांचा नातू असल्यामुळे लोक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याला ही नवीन ओळख मिळाली होती. परंतु ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तारक असं आहे.

दरम्यान, ज्युनिअर एनटीआरची दाक्षिणात्य कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही क्रेझ पाहायला मिळते. त्याला अभिनयाव्यतिरिक्त तो एक उत्तम डान्सरदेखील आहे. तो एक ट्रेण्ड डान्सर आहे. तसंच त्याने कुचिपूडी हा नृत्यप्रकारही शिकलेला आहे.