News Flash

‘बॅकवॉटर्स’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

केरळमध्ये बेपत्ता झालेल्या लहान मुलाची रहस्यमय कथा

केरळमध्ये हरवलेल्या मुलावर आधारित एक नवाकोरा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘बॅकवॉटर्स’ असे आहे. यात बाल तस्करी आणि हरवलेल्या मुलांची कथा दाखवण्यात येणार आहे. या रहस्यमय जगात डोकावणाऱ्या आशयघन आणि रहस्यमय चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव ठाकूर यांनी केले आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस केरळमधील अलाप्पूझा येथे चित्रित करण्यात येणार आहे.

अंकित चंदिरामणि यांचे ‘सनशाईन स्टुडिओज’ वितरण क्षेत्रात कायमच आघाडीवर राहिले. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपटांचे वितरक म्हणून आणि तब्ब्ल ७०हुन अधिक मराठी चित्रपटांचे वितरक आणि प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपले नाव कमावले. आता नव्याने सनशाईन स्टुडिओ ‘बॅकवॉटर्स’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

‘सनशाईन स्टुडिओ’ ही वितरक कंपनी पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्राकडे तिची पाऊले उचलत आहे. बऱ्याच नावाजलेल्या हिंदी चित्रपटांचे वितरक म्हणून आणि मराठी चित्रपटात वितरक आणि प्रतुतकर्ते म्हणून उत्तम कामगिरी केली. तब्बल ३०० हुन अधिक चित्रपटांचा अनुभव गाठीशी बाळगून ही कंपनी नव्याने निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. एक वितरक म्हणून कायमच ही कंपनी सिनेसृष्टीत अग्रस्थानी होती. बॉलिवूड आणि मराठीच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटाचे वितरण करून या कंपनीने चित्रपटसृष्टीत स्वतःचा दरारा निर्माण केला. अर्थात या सर्व यशामागे कंपनीची मेहनत कामी आले यात शंकाच नाही.

२००५ सालात केरळसारख्या देवांची भूमी मानल्या जाणाऱ्या शहरातून हरवलेल्या राहुल राजू या सात वर्षीय लहान मुलाचा शोध अजूनही लागलेला नाही, आज राहुल कुठे आहे हा प्रश्न आजही त्याच्या पालकांना सतावत आहे. राहुल प्रमाणे आजही कित्येक मुले बेपत्ता झाली असतील आणि त्यांचा शोध कशाप्रकारे घेतला जाईल यावर आधारित चित्रपट करणे म्हणजे एक टास्कच आहे. मात्र अशा जिवंत घटना लोकांसमोर येणे ही आवश्यक आहे. या सीरिजमध्ये दिल्ली थिएटर अभिनेता सरताझ खरे हा सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत महत्वाची भूमिका साकरणार आहे. तर युकेची मॉडेल नीता परानी ही एकाच वेळी अनेक तथ्यांच्या शोधात असणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 5:15 pm

Web Title: blackwater movie will be released soon avb 95
Next Stories
1 “लस कुठे उपलब्ध आहे ते सांगा?”; ‘त्या’ सेलिब्रिटींना निया शर्माचा सवाल
2 सलमानच्या ‘राधे’मध्ये जॅकलिनची एण्ट्री, ‘दिल दे दिया है’ गाणे प्रदर्शित
3 ‘त्या’ मुलांचं शिक्षण मोफत करा; सोनू सूदची सरकारकडे मागणी
Just Now!
X