News Flash

करोनासाठी शाहरुखच्या ऑफिसचा वापर, रुग्णांचं केलं विलगीकरण

खार येथील शाहरुखच्या कार्यालयाची इमारत मुंबई महापालिकेला मदतीसाठी दिली.

करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी पुढे येत खार येथील त्यांच्या कार्यालयाची इमारत मुंबई महापालिकेला मदतीसाठी दिली. करोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी या कार्यालयाची इमारत वापरावी असं म्हणत शाहरुखने मदत केली. त्यानंतर या कार्यालयात आवश्यक ते बदल करण्यात आले व विलगीकरणासाठी तयार करण्यात आले. आता महिन्याभरानंतर मुंबई महापालिकेने सहा करोना रुग्णांना याठिकाणी हलवलं आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी सहा रुग्णांचं या कार्यालयात विलगीकरण करण्यात आलं. शाहरुखच्या ‘मीर फाऊंडेशन’ची ही इमारत आहे. यामध्ये २२ जणांना क्वारंटाइन करण्यात येईल, अशी सुविधा करण्यात आली आहे.

“शाहरुखचं कार्यालय महापालिकेला सोपवल्यानंतर त्यात काही बदल करण्यात आले. प्रत्येक मजल्यावर दरवाजे, पाण्याचे फिल्टर्स, तात्पुरती शौचालये, बेड या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. डॉक्टर्सची कमतरता असल्याने हे विलगीकरण कक्ष अद्याप सुरू करण्यात आलं नव्हतं. मात्र आता स्थानिक रुग्णालयांच्या मदतीने ते सुरू करण्यात आलं आहे”, अशी माहिती एच (पश्चिम) वॉर्डचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त विनायक विसपुते यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली.

शाहरुख सध्या विविध मार्गांनी शक्य होईल तितकी मदत करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना आर्थिक मदतीसोबत जेवणंदेखील पुरवलं आहे. त्याने ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगारांना आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामानाची मदत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 5:53 pm

Web Title: bmc moves six patients into shah rukh khan office which is being used as covid 19 isolation center ssv 92
Next Stories
1 चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत मिलिंद सोमणचा पुढाकार; घेतला ‘हा’ निर्णय
2 युद्धानंतर श्री कृष्णासोबत काय घडलं? ‘सुनो महाभारत’मधुन उलगडणार ‘ती’ गोष्ट
3 Video: भारतीय शेतकऱ्यांची मुलं ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’च्या मंचावर; डान्स पाहून सायमन म्हणाला…
Just Now!
X