महाराष्ट्रातील सण आणि समारंभ जगभरात प्रसिद्ध आहेत. यातील दसरा, दिवाळी हे आपल्या सर्वांच्याच आवडीचे सण आहेत. या सणासुदीच्या धामधुमीत झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी एका विशेष चित्रपटाचे आयोजन केले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्यकाळी ६ वाजता ‘बोगदा’ हा खास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे तर जेष्ठ अभिनेत्री सुशास जोशी यांनी तिच्या आईची भूमिका साकारली आहे. आई(सुहास जोशी) आणि मुलीच्या नात्या भोवती हा चित्रपट गुंफलेला आहे. वडिलांची बेकारी आणि त्यानंतर त्यांच्या निधनामुळे तिच्या आईने तिला वाढवले आहे. तेजुला(मृण्मयी देशपांडे) एक नृत्यांगना होण्याची खूप इच्छा आहे आणि त्याच क्षेत्रात काम करण्यासाठी तिचं कोल्हापूरला जाण्याचं स्वप्नं मागे पडतं कारण तिच्या आईला एका दुर्धर आजार होतो.

यातून सुटका मिळवण्यासाठी आईची धडपड सुरु होते. शेवटचे दिवस एका गावात व्यतित करण्याबाबत दोघींचं एकमत होतं. मग दोघी या प्रवासाला निघतात. त्या प्रवासादरम्यान दोघींच्या नात्याला नवं वळण मिळतं. त्या प्रवासात काय होते हे जाणून घेण्यासाठी, रविवारी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.