News Flash

मायलेकीच्या नात्यामधला भावबंध मांडणारा ‘बोगदा’

हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मायलेकीच्या नात्यामधला भावबंध मांडणारा 'बोगदा'

आई आणि मुलीच्या नात्याचे विविध पैलू मांडणाऱ्या आगामी ‘बोगदा’ सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मायलेकीच्या नात्यामधला भावबंध मांडणारा हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘व्हीस्लिंग वूड’च्या शिलेदारांच्या मेहनतीतून साकार झालेल्या या ‘बोगदा’ चित्रपटाचे नितीन केणी प्रस्तुतकर्ते असून, दिग्दर्शिका निशिता केणीसोबत करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Bigg Boss Marathi : सई म्हणते, ‘ऐनवेळी मेघाने पाठीत खंजीर खुपसला’

हा सिनेमा नुकताच ७५ व्या ‘वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या अंतिम निवडप्रक्रीयेपर्यंत पोहोचला होता. जागतिक पातळीवरील या महोत्सवात ‘बोगदा’ सिनेमाने भारतातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमांच्या निवडप्रक्रियेत इतर चित्रपटांना चुरशीची लढत दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 7:48 pm

Web Title: bogda motion poster released marathi movie mrunmayee deshpande
Next Stories
1 Bigg Boss Marathi : सई म्हणते, ‘ऐनवेळी मेघाने पाठीत खंजीर खुपसला’
2 Baahubali: Before the Beginning : नेटफ्लिक्स आणणार बाहुबलीचा प्रिक्वल, उलगडणार शिवगामीची कथा
3 Paltan Trailer : कहाणी धाडसाची, चीनच्या सैन्याला भिडणाऱ्या भारतीय ‘पलटन’ची
Just Now!
X