हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केलं. गुन्हा घडलेल्या ठिकाणी चौकशीसाठी या चारही जणांना नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली. या घटनेनंतर प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यातच बॉलिवूडमध्ये आजवर अनेक धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये गुन्हेगारीवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. तसंच काही चित्रपटांमध्ये गुन्हेगारांचा एन्काऊंटरवर कसा करण्यात आला हेदेखील दाखविण्यात आलं.

१. बाटला हाऊस –

२००८ साली प्रेक्षकांच्या भेटीला ‘बाटला हाऊस’ या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहम हा मुख्य भूमिकेत झळकला आहे. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अधिकारी के के (रवी किशन) आणि संजीव कुमार यादव (जॉन अब्राहम) आणि त्यांच्या टीमने ‘बाटला हाऊस’ एल- १८ क्रमांकच्या इमारतीत शिरून दहशतवाद्यांशी केलेली कारवाई या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. यावेळी ‘बाटला हाऊस’मध्ये पोलिसांनी एका आरोपीचा एन्काऊंटर केला होता.

२. आर्टिकल १५ –

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या चित्रपटामध्ये आयुषमान खुराना याने मुख्य भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित असून पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा यात दाखविण्यात आली आहे. तसंच जातीय भेदभाववरून समाजात होणाऱ्या भीषण घटनांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये पगारवाढीची मागणी करणाऱ्या मुलींवर अत्याचार करण्यात आलेल्या आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्याचं दाखविण्यात आलं आहे.

३. शूटआऊट अॅट लोखंडवाला

२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटामध्ये १९९१ साली लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पोलीस आणि गुंडांची चकमक दाखविण्यात आली आहे.

४. अब तक छप्पन –

‘अब तक छप्पन’ या चित्रपटामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ही कथा सब इन्स्पेक्टर दया नायक यांच्या जीवनावर आधारित असून यात ५६ जणांचा एन्काऊंटर दाखविण्यात आला आहे.

५. शागिर्द –

२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘शागिर्द’ हा क्राइम अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन तिग्मांशू धुलिया यांनी केलं आहे. यात नाना पाटेकर, मोहित अहलावत, मोहित कुमार आणि रिमी सेन चित्रपटात झळकले आहेत.