23 November 2017

News Flash

‘केबीसी’मध्ये बिग बींच्या प्रश्नाचा सामना करताना अभिषेकच्या नाकी नऊ

या प्रश्नाचं उत्तर येत नसल्याचं पाहून अमिताभ बच्चन यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 3:37 PM

अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन

सर्वसामान्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि त्यांना कोट्यवधींची स्वप्न दाखवणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या ९ व्या पर्वाने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच या कार्यक्रमामध्ये ‘हॉट सीट’वर बसण्यासाठी आणि बिग बींच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घरचाच पाहुणा आला होता. हा घरचा पाहुणा कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला ना? अमितजींच्या या लोकप्रिय शोमध्ये त्यांच्या मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने नुकतीच हजेरी लावली. ‘गूंज फाऊंडेशन’चे संस्थापक अंशु गुप्ता यांच्यासोबत अभिषेकने या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं. १५ सप्टेंबरला हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी एक स्पर्धक म्हणून अभिषेकला फुटबॉल या खेळाशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याच्या नाकी नऊ आले होते. अभिषेकला खेळाची प्रचंड आवड आहे. त्यातही कबड्डी, फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांकडे त्याचा विशेष कल आहे. ज्यावेळी त्याला फुटबॉलशीच संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र त्याचं उत्तर देणं त्याला जमलं नाही.

वाचा : ‘केबीसी’चे स्वप्न १७ वर्षांपासून पाहणारी ‘ती’ घरी घेऊन गेली ‘एवढी’ रक्कम

खेळांमध्ये प्रचंड रुची असणाऱ्या ज्युनिअर बच्चनला ज्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही त्यावेळी खुद्द बिग बींनासुद्धा धक्काच बसला. किंबहुना यावेळी त्यांनी अभिषेकला एका गोष्टीची आठवणही करुन दिली. घरी अभिषेक वारंवार फुटबॉलविषयीच्याच चर्चा करत असतो. मग, आता त्याला या प्रश्नाचं उत्तर का देता येत नाहीये? असाच प्रश्न त्यांनीही उपस्थित केला. ‘हॉट सीट’वर आल्यानंतर भीतीने अनेकांच्याच पोटात गोळा येतो. अभिषेकवरही त्याचच दडपण आलं नसेल ना? काहीही असो, खेळाविषयी बरीच माहिती असणाऱ्या आणि ‘इंडियन सुपर लीगमध्ये ‘चेन्नई एफसी’ या फुटबॉल टीमचा मालक असणाऱ्या अभिषेकला या प्रश्नाचं उत्तर न येणं ही बाब अनेकांनाच धक्का देऊन गेली.

Since, apparently, it's friendship day!!! #happyfriendshipday #buddies4life #fathersandsons

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

First Published on September 14, 2017 3:37 pm

Web Title: bollywood actor abhishek bachchan comes on the kbc 9 show and does not answer the question about football father amitabh bachchan asks reason for that