26 January 2021

News Flash

अमरिश पुरी यांचा नातूही बॉलिवूडच्या मार्गावर

'मी एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या चित्रपटापासून सुरुवात करणार होतो. पण, काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही.'

वर्धन, अमरिश पुरी

‘मोगॅम्बो खुश हुआ’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा नातूही सध्या बॉलिवूडच्या मार्गावर असल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला बरेच स्टारकिड्स या कलाविश्वाच पदार्पण करण्याच्या तयारीत असतानाच या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. सूत्रांचा हवाला देत ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जयंतीलाल गडा यांची निर्मिती असणाऱ्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्यावर आजोबांचा फारच प्रभाव असल्याचं खुद्द वर्धननेच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्याने अमरिश पुरी यांना देवाचं स्थान दिलं असून, तो त्यांचा फार आदर करतो. येत्या काळात वर्धन प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज असून, त्याच्या या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण उत्तर भारतात होणार असल्याचं कळत आहे. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणाल असून, त्याच्याविषयीची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

वर्धनसाठी हे कलाविश्व काही नवं नाही. त्याने ‘इशकजादे’, ‘दावत-ए-इश्क’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांसाठी सहाय्य दिग्दर्शनाचंही काम केलं आहे. आपल्या पदार्पणाविषयी अधिक माहिती देत वर्धन म्हणाला होता, ‘मी जयंतीभाई यांच्यासोबत एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या चित्रपटापासून सुरुवात करणार होतो. पण, काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही. ज्यानंतर मला त्यांनी या चित्रपटासाठी विचारलं आणि मी त्यासाठी लगेचच तयारही झालो.’ सध्याच्या घडीला वर्धन त्याच्या भूमिकेच्या तयारीला लागला असून, त्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा कार्यशाळांनाही हजेरी लावत आहे. आपल्या आजोबांच्या म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरिश पुरी यांच्या चित्रपटांपैकी ‘विरासत’, ‘घातक’, ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे त्याचे सर्वात आवडीचे चित्रपट आहेत. तेव्हा आता या आणखी एका स्टारकिडचं स्वागत चाहते कसं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय आपल्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा वर्धन पूर्ण करतो का, याकडेही सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 11:02 am

Web Title: bollywood actor amrish puris grandson vardhan is the next star kid set for a bollywood career
Next Stories
1 वजन घटवण्यासाठी करिना वापरते ‘हा’ फंडा !
2 प्रियांका म्हणते, यापुढे मी तडजोड करणार नाही!
3 महेश बाबूने वाढदिवशी दिली चाहत्यांना खास भेट
Just Now!
X