News Flash

अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचे निधन

वयाच्या ९४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचे निधन झाले आहे. वयाच्या ९४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. बोमन इराणी यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अनेक कलाकारांनी कमेंट करत बोमन इराणी यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

बोमन इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘आईने झोपेतच अखेरचा श्वास घेतला. ती ९४ वर्षांची होती. वयाच्या ३२व्या वर्षापासून तिने माझ्यासाठी आई आणि वडील दोघांचीही कर्तव्ये पार पाडली. ती अतिशय उत्साही आणि हसमुख होती’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boman Irani (@boman_irani)

पुढे त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा मी चित्रपटांच्या चित्रीकरणास जात असे तेव्हा ती मला काळजी घेण्यास सांगत असे. ती नेहमी म्हणायची परत येताना पॉपकॉर्न आणायला विसरु नकोस. तिला गाणी ऐकायला आवडायची. तसेच एखाद्या गोष्टीबाबत शंका असेल तर लगेच त्याबद्दलची माहिती विकीपिडीया आणि आयएमडीबीवर चेक करण्याची तिला सवय होती. ती मला नेहमी सांगायची लोकं तुझ्या अभिनयाचे कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तू एक अभिनेता यासाठी आहेस जेणे करुन तुझ्या अभिनयातून लोकांना आनंद मिळेल. शेवटच्या रात्री तिने मलाई कुल्फी आणि आंबे खाण्यास मागितले होते. ती एक स्टार होती आणि कायम राहिल.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 7:42 pm

Web Title: bollywood actor boman irani mother passed away avb 95
Next Stories
1 Video : असा साजरा केला शिल्पा शेट्टीने आपला ४६ वा वाढदिवस
2 ‘पावनखिंड’चा थरार चित्रपटगृहातच!
3 ‘बाळकडू’च्या निर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक; पीएचडीची पदवी बोगस असल्याचं सिद्ध
Just Now!
X