बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचा आगामी चित्रपटातील एक फोटो समोर आला असून हा फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या फोटोत राजकुमार रावला ओळखणंही कठीण आहे. हा फोटो राजकुमार रावचा चित्रपट ‘लुडो’मधील आहे. फोटोमध्ये राजकुमार राव महिलेच्या वेशात असून हिरव्या रंगाचा लेहंगा घातलेला दिसत आहे. सोबत लांब केस आणि केलेला मेकअप यामुळे राजकुमार राव अगदी वेगळ्या रुपात दिसतोय. राजकुमार रावचा हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. राजकुमार रावने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला असून लिहिलं आहे, “हॅप्पी न्यू इअर”.
‘लुडो’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू करत आहे. डार्क कॉमेडी असऱ्या या चित्रपटात राजकुमार रावसोबत अभिषेक बच्चन, फातिमा शेख आणि पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल बोलताना अनुराग बासू यांनी सांगितलं होतं की, “चित्रपटामध्ये नव्या पिढीतील अभिनेते सहभागी असल्याने मी खूप आनंदी आहे. संगीताच्या बाबतीत मी माझा जुना मित्र प्रीतमवरच विश्वास दाखवला आहे. भुषण कुमार यांच्यासोबतही काम करायला मिळत असल्याचा मला आनंद आहे”.
View this post on Instagram
Happy new year guys. #LUDO @anuragbasuofficial @bhushankumar @tseries.official
राजकुमार राव ‘मेड इन चायना’ चित्रपटात शेवटचा दिसला होता. तसंच लुडो चित्रपटासोबत राजकुमार राव रुही अफ्जा आणि छलांग या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय प्रियंका चोप्रासोबत ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 2, 2020 10:56 am