News Flash

PHOTO – बर्थडे सेलिब्रेशनसाठी कतरिना-रणबीर एकत्र येतात तेव्हा..

एकेकाळी ही जोडी मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून चर्चेत होती..

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

एकेकाळी बॉलिवूडमधील मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या नात्यात काही महिन्यांपूर्वी दुरावा आला. त्यानंतर या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या खऱ्या, पण ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांनाही वारंवार एकमेकांसमोर यावं लागत होतं. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ब्रेकअपमुळे त्यांच्यात संकोचलेपणा पाहिला गेला. पण, त्यानंतर मात्र परिस्थिती काही प्रमाणात सुरळीत झाली. नुकतंच बी- टाऊनच्या या दोन्ही कलाकारांनी एकत्र येत दिग्दर्शक अनुराग बासूचा वाढदिवसही साजरा केला.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला अनुरागच्या वाढदिवसाचा फोटो पाहताना रणबीर- कतरिनाच्या नात्यात अद्यापही काही प्रमाणात संकोचलेपणा असल्याचं दिसतंय. फोटोमध्ये रणबीरचं- कतरिनाचं लक्षही दुसरीकडेच आहे. दरम्यान, कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही अनुरागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, तिच्या त्या शुभेच्छांपेक्षा ‘अनुरागदा’च्या बर्थडे सेलिब्रेशनच्या निमित्ताने एकत्र आलेले रणबीर आणि कॅटच सर्वांचं लक्ष वेधत आहेत. ब्रेकअपनंतर अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून रणबीर- कतरिना प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या वाटेत अडथळे येणारा हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून रणबीर निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे. रणबीर-कतरिनाचा हा तिसरा चित्रपट असून, ब्रेकअपनंतर ते पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी त्यांनी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनिती’ या चित्रपटांत एकत्र काम केले होते. १४ जुलैला ‘जग्गा जासूस’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सध्या हे दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटांवरही लक्ष केंद्रित करत आहेत. येत्या काळात कतरिना ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून झळकणार असून, रणबीर अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर बेतलेल्या एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रणबीरच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरु शकतो असंच अनेकांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 5:46 pm

Web Title: bollywood actor ranbir kapoor and actress katrina kaif come together to celebrate jagga jasoos director anurag basu birthday
Next Stories
1 Mubarakan: अथिया- अर्जुनची ‘क्युट केमिस्ट्री’
2 सलमानच्या घरासमोरील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश
3 सुशांत-अंकिताचे ‘पॅच अप’?
Just Now!
X