News Flash

VIDEO : काळवीट शिकार प्रकरणी चौकशीदरम्यानचा सलमानचा हा व्हिडिओ पाहिला का?

बऱ्याच वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ अचानक व्हायरल होतोय...

Salman Khan
सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि वादांचे नाते फार जुने आहे. हिट अँण्ड रन खटला असो किंवा काळवीट शिकार प्रकरण असो, सलमानला या सगळ्यामुळे अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने कंकणीजवळ काळवीटाची शिकार केली होती. दुर्मिळ प्रजातीच्या या काळवीटाच्या शिकारीवर सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सलमानविरुद्ध गुन्हा दाखल होऊन न्यायालयात त्याच्यावर खटला चालवण्यात आला. तब्बल १९ वर्षांनी या आरोपांतून सलमानची निर्दोष मुक्तता झाली. तेव्हापासून या प्रकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

मात्र, सध्या अचानक सलमान आणि काळवीट शिकार प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ. ‘देसीट्यूब’ या युटयूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या अनेकांचं लक्ष वेधतोय. यामध्ये एक सरकारी अधिकारी सलमानची चौकशी करत आहे.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

याशिवाय, सलमान काही कागदपत्रांवर सह्या करतानाही व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ १३ ऑक्टोबर १९९८ या दिवशी रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येतेय. या व्हिडिओच्या आवाजाचा दर्जा चांगला नसल्यामुळे अधिकारी आणि सलमानमधील संभाषण स्पष्टपणे ऐकू येत नाही. तरीही सोशल मीडियावर अनेकांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 3:44 pm

Web Title: bollywood actor salman khan black buck poaching case secret video of 1998 getting viral on internet and social media
Next Stories
1 काय? २४ वेळा रणवीरच्या कानशिलात लगावली!
2 बिग बॉसच्या घरात ती करणार ‘पहरेदारी’!
3 ‘या’ चार चुका कपिल शर्माला पडल्या महागात
Just Now!
X