News Flash

VIDEO : चाहत्यांच्या गराड्यात अडकला बी- टाऊनचा ‘बॉडीगार्ड’

सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

सलमान खान

एखाद्या लोकप्रिय चेहऱ्याच्या मागे नेहमीच चाहत्यांची प्रचंड गर्दी असते. अभिनेता सलमान खान हे त्यातीलच एक उदाहरण. आपल्या अभिनयाने आणि वेगळ्याच अंदाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. सलमान कुठेही गेला तरीही त्याच्या मागेपुढे चाहत्यांची तोबा गर्दी असतेच. पण, याच गर्दीमुळे तो अडचणीत पडल्याचं नुकतच पाहायला मिळालं.

सलमान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लूलिया वंतूर यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यातच ठेवलं असलं तरीही त्यांच्या नात्याविषयी चर्चा होतच असते. त्यातच ही जोडी जयपूरला गेली असता चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि तेथून बाहेर निघणं बी- टाऊनच्या या ‘बॉडीगार्ड’लाही अशक्य झालं. यावेळी सलमानचा अंगरक्षक शेराही त्यांच्यासोबत होता. पण, विमानतळावर ज्यावेळी सलमान येत असल्याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचली तेव्हा तिथे लगेचच गर्दी होण्यास सुरुवात झाली. सहसा सलमनसाठी गर्दी वगैरे सर्वकाही सवयीच्या गोष्टी आहेत. पण, त्यावेळी या परिस्थितीची त्यालाही कल्पना नव्हती.

वाचा : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणं पडलेलं महागात – नीना गुप्ता

अखेर त्याच्या अंगरक्षकांनी पुढे येत त्या गर्दीतून सलमानला वाट काढून देत बाहेर येण्यास मदत केली. सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर सलमान पुन्हा एकदा त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे. ‘भारत’ या आगामी चित्रपटामध्ये तो व्यग्र असल्याचं कळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 4:22 pm

Web Title: bollywood actor salman khan got stuck amidst fans at jaipur airport bodyguard comes to rescue
Next Stories
1 रणबीरविषयी आलियाची आई म्हणते..
2 Video : …जेव्हा जस्लीन सावरते अनुप जलोटा यांची बाजू
3 Koffee With Karan Season 6 Promo : सेलिब्रिटींना करावा लागणार करणच्या चुकीच्या प्रश्नांचा सामना 
Just Now!
X