20 January 2019

News Flash

‘ती’ अरबाजची प्रेयसी होती?

हाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

अरबाज खान

बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असणाऱ्या खान कुटुंबातील आणखी एक सदस्य प्रकाशझोतात आला आहे. सलमान खानचा भाऊ, अभिनेता अरबाज खान याला वांद्रे येथे पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. अरबाजला पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसण्याचे कारण म्हणजे त्याच्यासोबत असणारी एक तरुणी.

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अरबाजला त्याच्या प्रेयसीसोबत पाहण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अरबाजसोबत दिसणारी ती तरुणी त्याची प्रेयसी असून, ती आपला चेहरा लपवत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. वांद्रे येथील ‘स्मोक हाऊस’ येथून बाहेर येतानाच अरबाज आणि त्या तरुणीला पाहिले गेले. मुख्य म्हणजे ‘स्मोक हाऊस’मधून बाहेर येत असताना काही छायाचित्रकार बाहेर उभे असल्याचे लक्षात येताच, तिने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आणि थेट रिक्षात जाऊन बसली.

अरबाजसोबत दिसलेली ती तरुणी नेमकी कोण होती, याविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण, सध्या रंगणाऱ्या चर्चा पाहता ती त्याची प्रेयसीच असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचे नाव अलेक्झांड्रा नामक एका परदेशी तरुणीशीही जोडले गेले होते. त्यामुळे आता अरबाजच्या आयुष्यात असलेली ‘ती’ नेमकी आहे तरी कोण, असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

View this post on Instagram

#One of these nights #one of these crazy old nights ❤️

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

First Published on January 3, 2018 5:58 pm

Web Title: bollywood actor salman khans brother arbaaz khan and his girlfriend spotted at smoke house in bandra mumbai