News Flash

Sanju Movie : ‘संजू’विषयी खुद्द संजय दत्तच काय बोलतोय ऐकलं का?

संजूबाबाच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटासाठी रणबीरने फार मेहनत घेतली होती.

संजय दत्त, रणबीर कपूर, sanjay dutt reacted on ranbir kapoor playing sanju

Sanjay dutt reacted on Ranbir Kapoor Playing Sanju. अभिनेता रणबीर कपूर लवकरच ‘संजू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटात तो अभिनेता संजय दत्तची व्यक्तीरेखा साकारणार आहे. सध्या बॉलिवूड वर्तुळात रणबीरच्या या आगामी चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. ‘संजू’चा ट्रेलर म्हणू नका किंवा त्यातील गाणी आणि सहकलाकारांच्या भूमिका. प्रत्येक गोष्ट या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून जात आहे.

मुख्य म्हणजे रणबीरच्या कारकिर्दीच्या अनुषंगाने हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा असून, येत्या काळात त्याचं कलाविश्वातील स्थानही सर्वांसमोर स्पष्ट होणार आहे. या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी रणबीरने सुरुवातीपासूनच खूप मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं. ज्याची आता प्रत्येक स्तरातून प्रशंसा केली जात आहे. यातच आता खुद्द अभिनेताच संजय दत्तच्या नावाचीही भर पडली आहे.

‘इटी टाइम्स’शी संवाद साधताना संजय दत्तने रणबीरच्या ‘संजूमधील भूमिकेविषयी आपली प्रतिक्रिया दिली. रणबीरने साकारलेल्या ‘संजू’विषयी संजय दत्त म्हणाला, ‘रणबीरला मी काहीच सल्ला वगैरे देऊ इच्छित नाही. तो अतिशय उत्तम असंच काम करत आहे. मी चित्रपटाच्या सेटवर त्याचं जे काम पाहिलं ते अप्रतिमच होतं. त्यामुळे मी त्याला भावी वाटचालीसाठी फक्त आणि फक्त शुभेच्छाच देऊ इच्छितो.’

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

संजय दत्तची ही प्रतिक्रिया रणबीरसाठी अतिशय महत्त्वाची असणार यात वाद नाही. संजूबाबाच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटासाठी रणबीरने स्वत:च्या राहणीमानापासून ते रोजच्या जीवनशैलीमध्येही काही महत्त्वाचे बदल केले होते. आपलं सर्वस्व पणाला लावून रणबीरने साकारलेला हा ‘संजू’ २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता त्याला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 4:38 pm

Web Title: bollywood actor sanjay dutt reacted on ranbir kapoor playing biopic sanju
Next Stories
1 Sanju : ‘कारागृहातील त्या दृश्याला कात्री लावा अन्यथा..’
2 राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत
3 बॉलिवूडमध्ये असा सुरु झाला ‘शर्टलेस’चा ट्रेंड!
Just Now!
X