03 March 2021

News Flash

..या नावाने सुरु होणार शाहरुखचे नवे हॉटेल

नव्या इनिंगसाठी शाहरुख सज्ज..?

शाहरुख खान

बॉलिवूडमध्ये जवळपास २५ वर्षांपासून अभिनेता शाहरुख खानने विविध चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेता म्हणून शाहरुखने आजवरच्या कारकिर्दीत बरेच यश संपादन केले. असा हा अभिनेता आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्याचे म्हटले जात आहे. जर का मी अभिनेता नसतो तर मी एक शेफ नक्कीच झालो असे शाहरुखने बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पाककलेची आवड असणाऱ्या किंग खानने नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याच्या या आवडीविषयी सांगितले की, ‘मला पाककला शिकायला नक्की आवडेल. त्यासोबतच एके दिवशी काही मित्रमंडळी आणि शक्य असल्यास माझ्या चाहत्यांनाही माझ्या हातच्या जेवणाचा चव चाखायला देईन.’

‘एचटी’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला, ‘मला खरंच पाककला फार आवडते. मी जर का हॉटेलच्या व्यवसायात उतरलो तर ते किती फायद्याचे असेल…’ यासोबतच त्याने रेड चिलीज या त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या नावामागचाही एक धमाल किस्सा सांगितला. ‘जुही चावलाने एकदा मला प्रश्न विचारला होता की, तुझ्या कंपनीचं नाव रेड चिलीज का? त्यावर मी तिला (हसून) म्हटलं, जर का पुढे जाऊन चित्रपटांमध्ये मला अपयश आलं तर मग मी हॉटेल व्यवसायाकडे वळेन आणि तेव्हा त्या हॉटेलला रेड चिलीज हे नाव चालेलच..’

भारतीय समाजात पाककलेकडे आदरानं बघितलं जातं. याविषयीच सांगताना शाहरुख म्हणाला, ‘अभिनयसुद्धा एखाद्या पाककलेप्रमाणेच इतरांसमोर सादर केला जातो. एक कलाकार म्हणून तुम्ही तुमची कला जेव्हा इतरांसमोर सादर करता तेव्हा ती कला प्रेक्षकांना आवडली पाहिजे, एवढीच तुमची इच्छा असते. कारण ती कला सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मिळालेला आनंद समोरच्यांनाही मिळावा अशीच तुमची इच्छा असते.’ पाककला आणि अभिनय कौशल्य यांची सांगड घालत शाहरुखने मांडलेली त्याची भूमिका पटण्याजोगी आहे. त्यामुळे येत्या काळात तर त्याने त्याचे हॉटेल सुरु केले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.

दरम्यान, शाहरुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्ताने विविध ठिकाणांना भेट देतो आहे. सोशल मीडियावरही त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. किंग खान येत्या काळात अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पंजाबमध्ये सुरु असल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 6:33 pm

Web Title: bollywood actor shah rukh khan may open a restaurant called red chillies
Next Stories
1 Baahubali 2 Hindi jukebox out: ‘बाहुबली’ हिट गाणी फ्लॉप!
2 ‘बेगम जान’ विद्या चित्रपटसृष्टीला करणार होती अलविदा…
3 रजनीकांत म्हणतात, कमल हसन खूप रागीष्ट व्यक्ती!
Just Now!
X