01 March 2021

News Flash

मिशाचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना मीराने फटकारले

बऱ्याचदा शाहिदनेही मिशाचा चेहरा माध्यमांपासून लपवला होता.

मीरा राजपूत

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे अनेकांच्याच आवडीचं सेलिब्रिटी जोडपं आहे. शाहिदच्या आयुष्यात मीरा आली आणि चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नसतानाही तिने परिस्थितीशी जुळवून घेतलं. इतकंच नव्हे तर, कलाकारांमध्येही तिचा वावर पाहण्याजोगा आहे. सध्या हे जोडपं त्यांच्या चिमुकल्या मुलीमुळे म्हणजेच मिशा कपूरमुळे चर्चेत आहे. शाहिद आणि मीरासोबत हल्ली मिशाही विविध ठिकाणी दिसते. यावेळी बॉलिवूडच्या या सेलिब्रिटी जोडप्यापेक्षा मिशाच अनेकांचे लक्ष वेधते. मिशाची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारही गर्दी करतात. पण, छायाचित्रकारांचं हे असं वागणं शाहिदच्या पत्नीला काहीसं खटकत असल्याचं दिसतं.

काही दिवसांपूर्वी मीरा आणि मिशा एका उद्यानात गेल्या होत्या. तेव्हा मिशा लहान मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी काही छायाचित्रकारांनी मीरा आणि मिशाचे फोटो काढण्यास सुरुवात केली. उद्यानातून बाहेर आल्यावरही अनेक छायाचित्रकार त्या दोघींच्या येण्याची वाट पाहात होते. सतत आपल्यामागे असणारी छायाचित्रकारांची गर्दी आणि मिशाचे फोटो घेण्यासाठी त्यांची सुरु असणारी धडपड या सर्व गोष्टी मीराला न पटल्यामुळे तिने ‘इन्स्टा स्टोरी’च्या माध्यमातून, छायाचित्रकारांना फटकारल्याचं पाहायला मिळालं. ‘तुम्ही जरा समंजसपणे वागू शकता का? लहान मुलांना त्यांच्या बालपणाचा आनंद घेऊ द्या आणि त्यांचे फोटो काढण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर सोडा’, असं लिहित तिने नाराजी व्यक्त केली.

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

मीराने सोशल मीडियावरुन केलेली ही पोस्ट पाहता तिच्या बोलण्याचा आता छायाचित्रकारांवर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मिशाचे फोटो काढण्याबाबत शाहिद आणि मीरा नेहमीच जास्त काळजी घेत असल्याचे पाहायला मिळते. मिशाच्या जन्मानंतरही बऱ्याच दिवसांनी शाहिदने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. किंबहुना बऱ्याचदा त्याने तिचा चेहरा माध्यमांपासून लपवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 12:39 pm

Web Title: bollywood actor shahid kapoor wife mira rajput slams paparazzi for clicking photos of daughter misha kapoor
Next Stories
1 २४ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल- डिंपल कपाडिया
2 ..तेव्हा जेनेलिया रितेशशी बोलत नव्हती
3 Rajinikanth’s political debut: रजनीकांतच्या अॅपवर ३ लाख लोकांनी केली नोंदणी
Just Now!
X