गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हावर मुकेश खन्ना यांनी निशाणा साधल्यामुळे ती चर्चेत आहे. अशातच तिचे वडिल शत्रूघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीला पाठिंबा देत मुकेश खन्ना यांना चांगलेच सुनावले होता. शत्रूघ्न सिन्हा हे बॉलिवूडमध्ये खासकरुन त्यांच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. ते त्यांचे मत लोकांसमोर मांडतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये देखील पैशाची मदत केल्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्याची माहिती देणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

शत्रूघ्न सिन्हा यांनी मुलाखतीमध्ये अप्रत्यक्षपणे अभिनेता अक्षय कुमारला सुनावले आहे. ‘आपण केलेल्या मदतीची घोषणा करणे हे फार चुकीचे आहे. कोणी २५ कोटी रुयांची मदत केली हे ऐकून खराब वाटतं’ असे त्यांनी म्हटले. त्यांनी अक्षयचे नाव न घेता हे वक्तव्य केले आहे. ‘सध्याच्या परिस्थितीची कोणाला किती जाणीव आहे हे लोक त्याने केलेल्या मदतीवरुन ठरवतात. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात कलाकाराने मदत केल्यानंतर त्याचा दिखावा करणे चुकिचे आहे. कारण ती एक खासगी गोष्ट आहे’ असे शत्रूघ्न पुढे म्हणाले आहेत.

आणखी वाचा : अक्षय कुमारला ‘कॅनेडियन’ म्हणणाऱ्यांना परेश रावलने चांगलेच सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अक्षय कुमारने ट्विट करत २५ कोटींची मदत केल्याचे सांगितले. “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचे आहे ते सगळे केले पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…” असे त्यांने ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याचे कौतुक केले.