03 March 2021

News Flash

Aiyaary poster: सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

चित्रपटाच्या निमित्ताने नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

छाया सौजन्य- सोशल मीडिया

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटकडे एकाएकी अनेकांच्याच नजरा वळल्या आहेत. यावेळी कोणा एका अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले गेल्यामुळे तो चर्चेत नसून, त्याच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सिद्धार्थ २०१८च्या सुरुवातीलाच २६ जानेवारीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अय्यारी’ या चित्रपटातून सिद्धार्थ आणि मनोज बाजपेयी पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. नीरज पांडेच्या या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या असून या चित्रपटाचे कथानक नेमके कसे असणार, याबाबत अनेकांनी तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित असून नक्की कोणत्या घटनेला पांडे पडद्यावर आणणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाचा पोस्टर पाहिला असता प्रथमदर्शनी ‘अय्यारी’ अंडरवर्ल्डशी निगडीत असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. ‘अय्यारी’चा फर्स्ट लूक आणि एकंदर स्टारकास्ट पाहता नीरज पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘बेबी’, ‘स्पेशल २६’ असे दर्जेदार चित्रपट सादर करणाऱ्या नीरज पांडे यांनी ‘अय्यारी’च्या रुपात एक नवे आव्हान हाती घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 7:40 pm

Web Title: bollywood actor sidharth malhotra and manoj bajpayee starer new movie aiyaary directed by neeraj pandey poster released
Next Stories
1 …म्हणून अल्का याज्ञिकने आमिरला खोलीबाहेर काढले
2 Happy Birthday Jitendra: ‘ग्रीटींग’मधून बालमित्र जागवणार ‘डेटींग’च्या आठवणी
3 ..या नावाने सुरु होणार शाहरुखचे नवे हॉटेल
Just Now!
X