27 February 2021

News Flash

पैशांअभावी शस्त्रक्रिया थांबलेल्या चिमुकल्याला सोनू सूदची मदत; ट्विट शेअर करत म्हणाला…

सोनू सूदने पुन्हा दिला मदतीचा हात

करोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन झाला आणि अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं. यात अनेकांवर उपासमारीचीदेखील वेळ आली. मात्र, देशातील नागरिकांच्या या संकटकाळात अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. सोनू सूदने अनेकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गेल्या १०-११ महिन्यांपासून तो सातत्याने गरजुंची मदत करत आहे. अलिकडेच त्याने एका लहान मुलाच्या पायच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केल्याचं समोर आलं आहे.

सोनू सूद सातत्याने गरजुंची मदत करत आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सोनू सूदची मदत घेताना दिसतात. यात अलिकडेच एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून सोनू सूदकडे त्याच्या लहान भावासाठी मदत मागितली होती.


या व्यक्तीची समस्या समजून घेतल्यानंतर सोनूने क्षणाचाही विलंब न करता या व्यक्तीस मदत केली आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या लहान भावावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याविषयी संबंधित व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून सोनू सूदचे आभार मानले आहेत.


“सर, गेल्या तीन महिन्यांपासून पैशांअभावी आम्हाला आमच्या लहान भावावर उपचार करता येत नव्हते. पण, आता तुमच्या एका सहकार्याच्या मदतीमुळे हे उपचार करणं शक्य झालं. माझ्या भावाला पायावर उभं करण्यासाठी मनापासून खूप आभार”, असं ट्विट करत या व्यक्तीने सोनू सूदचे आभार मानले आहेत.

वाचा : ‘त्यामुळेच हे संकट उद्भवलं’; चमोलीतील जलप्रलयावर सेलिब्रिटींनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, या व्यक्तीचं ट्विट पाहिल्यानंतर सोनू सूदनेदेखील त्याला उत्तर दिलं आहे. ‘पैशांअभावी उपचार होत नसतील तर, आपण कोणत्या अधिकाराने भारतीय आहोत’, असं म्हणत सोनू सूदने या व्यक्तीला रिप्लाय दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 11:24 am

Web Title: bollywood actor sonu sood help little boy ssj 93
Next Stories
1 ‘त्यामुळेच हे संकट उद्भवलं’; चमोलीतील जलप्रलयावर सेलिब्रिटींनी व्यक्त केली चिंता
2 “हे देशभक्त आता ईलेक्ट्रीकल्स कार चालवतात का?”
3 मुहूर्त ठरला! राहुल वैद्य ‘या’ महिन्यात बांधणार दिशासोबत लग्नगाठ
Just Now!
X