20 September 2020

News Flash

…म्हणून सलमानने सुशांतला फटकारले?

'दबंग खान'चे सुशांतसोबतचे समीकरण फारसे चांगले नाही.

सलमान खान, सुशांत सिंग राजपूत

‘यारों का यार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान नेहमीच नवोदित कलाकारांना पाठिंबा देतो. पण, वेळ पडल्यास तो या कलाकारांना रागेही भरतो असे म्हणायला हरकत नाही. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सलमानने अभिनेता सुशांत सिंग राजपूतला रागे भरले आहे.

सूरज पांचोलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याने सुशांतची कानउघडणी केल्याचे म्हटले जातेय. सूरजसोबत सुशांत बेशिस्तपणे वागला असल्याचे कळताच, सलमानने त्याला बोलावून घेतले आणि सूरजपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिला. सरतेशेवटी सलमानची माफी मागण्यावाचून सुशांतकडे कोणताच पर्याय नव्हता. सूरज पांचोलीवर सलमानचा वरदहस्त असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. किंबहुना त्याच्या बॉलिवूड पदार्पणातही ‘भाईजान’नेच हातभार लावला होता. त्यामुळे आपल्या गोटातील कलाकारासोबत कोणी चुकीच्या पद्धतीने वागल्याचे कळताच सलमान लगेच त्याची दखल घेतो.

सलमान खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या तारा काही केल्या जुळण्याचे नाव घेत नाहीयेत. बऱ्याच सेलिब्रिटींसोबत मित्रत्वाचे नाते असणाऱ्या या ‘दबंग खान’चे सुशांतसोबतचे समीकरण फारसे चांगले नाही. त्यामुळे सुशांतविषयी काही प्रश्न विचारल्यासही आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणत सलमान त्याच्याविषयी बोलणे टाळतो, अशी चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्याचे पाहायला मिळते.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

View this post on Instagram

In Greece

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 12:47 pm

Web Title: bollywood actor superstar salman khan blasts sushant singh rajput for misbehaving at a party with another actor
Next Stories
1 आलिया भट्टचा नवा ‘कटोरी कट’ पाहिलात का?
2 असभ्य वर्तन करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे – बबिता फोगट
3 PHOTO : ‘रेगे’ फेम आरोह वेलणकरचे हटके प्री-वेडिंग फोटोशूट
Just Now!
X