27 February 2021

News Flash

“असं काय आहे ज्यासाठी जीव देऊ शकतो, हे मला समजून घ्यायचं होतं”; सुशांत सिंगची ‘ती’ मुलाखत चर्चेत

सुशांच सिंग राजपूतची मुलाखत व्हायरल

सुशांत सिंह राजपूत

असं काय आहे ज्यासाठी जीव देऊ शकतो, हे मला समजून घ्यायचं होतं आणि हे शब्दांमध्ये समजू शकत नाही हे शब्द आहेत सुशांत सिंग राजपूतचे. एका मुलाखतीत बोलताना सुशांत सिंगने आत्महत्येसंबंधी भाष्य केलं होतं. त्याच्या आत्महत्येनंतर ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याने बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सुशांतने मानसिक तणावात असल्यानेच आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. त्याच्या मृत्यूमागे अजून काही कारण आहे का याची माहिती पुढील काही दिवसात समोर येईल. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटातील सीन, जुन्या मुलाखती अनेकजण शेअर करत आहेत.

सुशांतने मुलाखतीत नेमकं काय म्हटलं होतं –
असं काय आहे ज्यासाठी जीव दिला जाऊ शकतो हे मला समजून घ्यायचं होतं. हे शब्दांत सागू शकत नाही. मग तुम्ही तो फिल घेऊ शकत नाही. जेव्हा लोक स्वप्नांचा पाठलाग करतात तेव्हा भीती आणि हाव नसते. जेव्हा तुम्हाला जास्त इच्छाही नाही आणि भीतीही नाही तेव्हा कमालीची हिंमत येते. ज्यांना जास्त इच्छा आणि भीती नाही त्यांचं तर शनीदेखील वाकडं करु शकत नाही. कोणत्या गोष्टींची भीती वाटली पाहिजे हेदेखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. पण त्यानंतरही तुम्हाला भीती वाटत नाही आणि हाव होत नाही तर मग बळ मिळतं.

अभिनय करताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही यासाठी मी एक गोष्ट समजून घेतली. अभिनय खोटा नसतो. अभिनय करताना अनेकदा अभिनेता खरं बोलत असतो, पण तो अभिनय वाटतो. आधीच्या काळात भाषा नव्हती. इशाऱ्यानेही समोरचा काय सांगतोय हे समजू शकतो. पण गैरसमज वाढू नयेत यासाठी शब्दांची गरज लागली आणि भाषा निर्माण झाली.

माझ्या आयुष्यात कोणतीही निगोशिएट करण्यासारखी कोणती गोष्ट नव्हती. हे झाल्यावर मी जीव देईन असं म्हणण्यासारखी. आजकाल लोक अशा गोष्टी बोलत नाहीत. काय मूर्खपणा करताय असं लोक म्हणतील. इथपर्यंत ठीक आहे हे तुमचं पॅशन आहे पण पुढचं काय असं विचारतात. जीव देण्यासारखी कोणती गोष्टच नाही असं लोक बोलू लागलेत.

आधीच्या काळात जेव्हा लोक बोलायचे की एकमेकांसाठी जीव देऊ. तेव्हा ९० टक्के लोक जीव देत नव्हते पण तयार होते. तयारीच खूप मोठी गोष्ट होती आपल्यामधील अनेक गोष्टी पाहण्यासाठी. मी जेव्हा पात्र पहायचो त्यांना माहिती आहे काय करायचं किंवा मग आपलं काम करुन दुसऱ्यांचं भलं करणारे तसंच आपल्यासाठी काही न करता दुसऱ्यांचं भल करणारे इथपर्यंत मी समजू शकतो. पण असं काय आहे ज्यासाठी जीव देऊ शकतो हे मला समजून घ्यायचं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 3:30 pm

Web Title: bollywood actor sushant singh rajput viral interview taking about suicide sgy 87
Next Stories
1 ग्रामीण राजकारणावर भाष्य करणारा सिनेमा ‘खुर्ची’
2 दीपिकाच्या दारात तीन तास गुलाब घेऊन उभा होता नील नितीन मुकेश, आणि…..
3 सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार होणार रद्द?; ऑस्कर सदस्याचे धक्कादायक वक्तव्य
Just Now!
X