News Flash

अदिती राव हैदरीचं मल्याळम चित्रपटात पदार्पण; ‘सूफीयाम सुजातयम’चा ट्रेलर प्रदर्शित

अदितीची दाक्षिणात्य कलाविश्वात विशेष क्रेझ आहे

‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. ‘ये साली जिंदगी’, ‘भूमी’, ‘रॉकस्टार’, ‘मर्डर ३ हे काही मोजके चित्रपट सोडले तर तिचा म्हणावा तसा कलाविश्वात वावर नाही. परंतु तरीदेखील तिची लोकप्रियता अफाट असल्याचं पाहायला मिळतं. दासदेव या चित्रपटानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची वाट धरलेली अदिती लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अॅमेझॉन प्राइम या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर अदितीचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘सूफीयाम सुजातयंम’ असं या चित्रपटाचं नाव असून अॅमेझॉन प्राइमची ही निर्मिती आहे.  नारनी पूझा दिग्दर्शित या मल्याळम चित्रपटात अभिनेता जयसूर्या आणि अदिती मुख्य भुमिकेत झळकणार आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘सूफीयाम सुजातयम’च्या माध्यमातून मी मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहे. मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली ही खरंच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. या चित्रपटातून एक सुंदर प्रेमकथा उलगडली जाणार आहे, असं अदिती म्हणाली.

दरम्यान, हा चित्रपट येत्या ३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदितीने आतापर्यंत ‘ये साली जिंदगी’, ‘भूमी’, ‘रॉकस्टार’, ‘मर्डर ३’, ‘दिल्ली ६’ आणि ‘दासदेव’ या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 4:23 pm

Web Title: bollywood actress aditi rao hydari film sufiyan sujatayam trailer out 93
Next Stories
1 बेरोजगार भाडेकरुंना अभिनेत्रीने केली मदत; माफ केलं थकित भाडं
2 FIR मालिकेचे निर्माते अन्य ठिकाणी काम करु देत नाहीत; कविता कौशिकचा खुलासा
3 Video : अभ्यासाचा कंटाळा आणि डोंगरावरची शाळा; सखी गोखले सांगतेय मजेदार किस्सा
Just Now!
X