29 October 2020

News Flash

VIDEO : राणी पद्मावतीच्या रुपात दीपिकाने असे मानले सर्वांचे आभार

भन्साळींच्या या चित्रपटाने सर्वांच्या मनावर राज्य केलं

दीपिका पदुकोण

‘पद्मावत’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांचेच आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ४०० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडणाऱ्या या चित्रपटाच्या यशाबद्दल दीपिकाने एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचे आभार मानले. हा चित्रपट दीपिकाच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे.

राणी पद्मावतीच्याच रुपात आणि ‘पद्मावत’ला साजेशा अंदाजात तिने सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘घुमर’ गाण्याच्या मदतीने राणी पद्मावतीच्या वेशात दीपिका या व्हिडिओतून भेटीला येत पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकून जाते.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला होता. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने २३६ कोटींचा आकडा पार केला असून, अजूनही त्याच्या कमाईचे आकडे उंचावतच आहेत. फक्त प्रेक्षकांवरच नव्हे तर बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांच्या मनावरही भन्साळींच्या या चित्रपटाने राज्य केल्याचं पाहायला मिळतय. ‘पद्मावत’ हा सर्वतोपरी उजवा ठरला असं मतही अनेकांनी मांडलं. बॉलिवूडमध्ये ‘पद्मावत’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन आकारण्यात आलं होतं. असा हा चित्रपट येत्या काळात आणखी कोणत्या बॉक्स ऑफिस विक्रमांना गवसणी घालतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 3:46 pm

Web Title: bollywood actress deepika padukone post video thanks fans for sanjay leela bhansalis movie padmaavat the most successful film of her career
Next Stories
1 यंदाचा व्हॅलेन्टाईन डे स्पेशल होण्यासाठी रेमो डिसोजाचे खास गिफ्ट
2 PHOTO : इशानचे जान्हवीसाठी कायपण!
3 आमिरची उंची
Just Now!
X