‘कॉकटेल’ या चित्रपटात साध्याभोळ्या ‘मीरा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री डायना पेन्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालीये. पण, यावेळी तिचा लूक मात्र फारच वेगळा असल्याचं लक्षात येतंय. ‘कॉकटेल’ आणि ‘हॅप्पी भाग जायेगी’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा अगदी वेगळ्या भूमिकेतून डायना रुपेरी पडद्यावर झळकणार आहे ते म्हणजे ‘परमाणू’ या चित्रपटातून. ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’, या चित्रपटातून ती एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. डायनाने स्वत: तिचा हा नवा लूक ट्विटरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला आहे.

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये डायना सैन्यदलाच्या गणवेशात दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पाहायला मिळत आहेत. तिचा हा लूक सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. खुद्द डायनानेच या लूकबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘परमाणूतील लूक शेअर करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
this reason Vijay Chawan wife vibhavari chawan exit the acting field
…म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

काही दिवसांपूर्वीच अभिनेता जॉन अब्राहमने या चित्रपटाच्या फर्स्ट लूकवरुन पडदा उचलला होता. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटातून १९९८ साली पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचणीचा प्रसंग पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे. या चित्रपटाच्या बहुतांश भागाचं चित्रीकरण राजस्थानातील जैसलमेर भागात केलं जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘क्रिअर्ज एन्टरटेन्मेन्ट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता बोमन इराणीसुद्धआ झळकणार आहे.

पोखरण येथे झालेली आण्विक चाचणी भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असून दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचाही त्यात महत्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भूतकाळाची पानं उलटली जाणार असंच म्हणावं लागेल.