मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा गेल्याच आठवड्यात साखरपुडा पार पाडला. इटलीतील लेक कोमो परिसरात पार पडलेल्या या साखरपुड्यात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती. प्रियांका- निक जोनासपासून अनिल कपूर, सोनम आहुजा, जान्हवी असे अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र ईशाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी तिची बालमैत्रिण मात्र अनुपस्थित होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही बालमैत्रिण म्हणजेच एम.एस. धोनी फेम किआरा अडवाणी होय. किआरानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर ईशा अंबनीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. बालपणीच्या अनेक आठवणींना किआरानं आपल्या पोस्टमधून उजाळा दिला आहे. तसेच बालमैत्रिणीला तिनं भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या आहे.

ईशाच्या साखरपुड्यासाठी किआरा काही कारणांमुळे उपस्थित राहू शकली नाही. मात्र मी तुझ्यासोबत नेहमीच असेल हे सांगायला किआरा विसरली नाही. प्रकृतीच्या कारणामुळे किआरा साखरपुड्यासाठी अनुपस्थित होती असं समजत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kiara advani wished her childhood friend isha ambani on her engagement
First published on: 24-09-2018 at 12:59 IST