News Flash

PHOTOS : नेहा धुपिया झाली या क्रिकेटपटूची सून

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा शमत नाहीत तोच आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

neha
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा शमत नाहीत तोच आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा धुपिया. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने अभिनेता अंगद बेदीशी लग्नगाठ बांधली असून, आता ती ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांची सून झाली आहे.

३७ वर्षीय नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंगदसोबतचा एक फोटो पोस्ट करत याविषयीची अधिकृत माहिती दिली. नवी दिल्ली येथे पारंपरिक शीख विवाहपद्धतीनुसार अानंद कारजमध्ये नेहा आणि अंगदने सहजीवनाची वचनं दिली. नेहामागोमागच अंगदनेही सोशल मीडियावर आपल्या लग्नाची माहिती दिली. या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाविषयी माहिती मिळताच अनेकांनाच धक्का बसला. पण, लगेचच चाहत्यांनी या दोघांनाही शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. नेहा आणि अंगद या दोघांनीही लग्नातील फोटो पोस्ट करत त्यांच्या मैत्रीचं रुपांतर एका सुरेख नात्यात झाल्याचं सर्वांना सांगितलं आहे. एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड्स’ म्हणवणारे नेहा आणि अंगद विवाहबंधनात अडकल्यामुळे चाहत्यांमध्येही सध्या आनंदाला उधाण आलं आहे.

वाचा : VIDEO: पहिल्या प्रेमाचा उल्लेख करताना धोनी मध्येच थांबला…म्हणाला बायकोला काहीही सांगू नका

ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतूनही तो झळकला होता. येत्या काळात अंगद ‘सुरमा’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 3:18 pm

Web Title: bollywood actress neha dhupia weds actor angad bedi she married her best friend pic viral
Next Stories
1 ऐश्वर्याचं ‘इन्स्टाग्राम’वर लवकरच पदार्पण
2 ‘केसरी’मुळे खिलाडी कुमारला कोट्यवधींचा फटका, नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीचा नकार
3 संजूबाबा पुन्हा होणार खलनायक