News Flash

Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

प्रत्येक दिवस हा तितकाच खास आणि प्रेमाने बहरलेला असला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, मधू चोप्रा

प्रियांका चोप्राने भारतीय कलाविश्वात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली. हिंदी कलाविश्वात नावारुपास आल्यानंतर या ‘देसी गर्ल’ने आपला मोर्चा परदेशी कलाविश्वाकडे वळवला आणि पाहता पाहता तिथेही तिनं चांगलाच तग धरला. गेल्या काही वर्षांमध्ये प्रियांकाने तिच्या कारकिर्दीत अशी काही उंची गाठली की, पाहता पाहता तिच्या यशाचा अनेकांनाच हेवा वाटू लागला. अशी ही ‘देसी गर्ल’ सध्या भारतात असून त्यामागेही खास कारण आहे.

गेल्या महिन्यातच प्रियांका आणि तिचा प्रियकर निक जोनास यांनी साखरपुडा केल्याचं कळलं होतं. त्यावरच आता शिक्कामोर्तब झालं आहे. भारतीय पद्धतीने रोका पार पाडत प्रियांका आणि निकच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्या नात्याला नवं नाव देण्यात आलं. आपल्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या या वळणामुळे प्रियांकाची आई, मधू चोप्राही फार आनंदात असून, त्यांनी आपल्या लेकीला आणि तिच्या होणाऱ्या पतीला एक खास सल्लाही दिला आहे.

‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्राच्या आईने स्वत:च्या वैवाहिक आयुष्याचं उदाहरण देत लग्नाच्या बाबतीत या नात्यांचा महाल उभारताना त्यात दररोज एक एक वीट जोडली जावी, असं म्हटलं आहे. प्रत्येक दिवस हा तितकाच खास आणि प्रेमाने बहरलेला असला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा

आपल्या पत्नीच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी पतीने नेहमीच सजग असलं पाहिजे, असं म्हणत प्रियांकाला बऱ्याच आधीपासून या सर्व गोष्टींची आमच्याकडून समज मिळाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता आईकडून मिळालेला हा सल्ला आणि प्रियजनांचे आशिर्वाद यांच्या बळावर प्रियांका आणि निकच्या नात्यात प्रेमाचा बहर कायम राहील अशीच सर्वांना अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 3:12 pm

Web Title: bollywood actress priyanka chopra nick jonas engagement mom madhu chopra has this important advice for the couple
Next Stories
1 सहजीवनाचा पहिला टप्पा सर, थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा
2 Kerala floods: देवभूमीसाठी कलाकारांनीही दिला आर्थिक मदतीचा हात, केली याचना
3 साखरपुड्याची जय्यत तयारी, प्रियकरासवे ‘देसी गर्ल’चा थाट भारी
Just Now!
X