11 December 2017

News Flash

तिच्या चेहऱ्याकडे तर पाहा; नेटिझन्सने उडवली प्रियांकाची खिल्ली

'किती हा मेकअप...'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 4:50 PM

प्रियांका चोप्रा

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर करत असते. विविध दौऱ्यांपासून ते अगदी पुरस्कार सोहळ्यांच्या रेड कार्पेटपर्यंत सर्वच ठिकाणी प्रियांका कशी वावरते, ती कोणकोणत्या ठिकाणी जाते या साऱ्याची माहिती तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहूनच मिळते. तिच्या फॉलोअर्सचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. पण, सध्या मात्र एक फोटो पोस्ट करणं तिच्या अंगलट येताना दिसतंय.

प्रियांकाच्या प्रत्येक फोटोवर तिचे फॉलोअर्स लगेच व्यक्त होतात, तिची प्रशंसा करतात. पण, यावेळी ‘मंडे मोटिवेशन’ असं कॅप्शन देत तिने पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकांनी थेट तिच्या सौंदर्यावरच टीका केली आहे. यावेळी पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये अनेकांनीच तिच्या मेकअपविषयी प्रतिक्रिया देत ‘किती हा मेकअप…’ असं म्हटलं आहे. तर एका फॉलोअरने तिच्या कोमेजलेल्या त्वचेकडे लक्ष वेधलं आहे. ‘तिचा मेकअप चुकीचा आहे’, ‘लिपस्टीक लावण्याची पद्धत चुकली आहे’, ‘आम्हाला तर फक्त मेकअपच दिसतोय’ अशा अनेक कमेंट्स फॉलोअर्सनी केल्या.

And then you can see… ❤️💋#mondaymotivation

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सेलिब्रिटींची खिल्ली उडवण्याचं प्रमाण फार वाढलं आहे. त्यामुळे सेलिब्रिटीही त्यांचे फोटो पोस्ट करताना आता बरेच सजग असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रोल होणं हे प्रियांकासाठी नवीन नाही. काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकाच्या ट्रेंच कोट गाऊनवरुन तिची खिल्ली उडवण्यात आली होती. पण, तेव्हा मात्र तिने खिल्ली उडवणाऱ्यांच्या कमेंट्स फारशा मनावर घेतल्या नव्हत्या. उलट असे कलात्मक विचार करणाऱ्या नेटिझन्सचं मला कौतुकच वाटतं असं म्हणत टिकाकारांची प्रशंसा केली होती. तेव्हा आता ही ‘ग्लोबल स्टार’ नेटिझन्सना काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First Published on October 4, 2017 4:41 pm

Web Title: bollywood actress priyanka chopra trolled for posting a photo on social media