Priyanka Chopra. सेलिब्रिटींच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी, त्यांच्यावर रोखलेल्या कॅमेऱ्यांच्या नजरा या सर्व गोष्टींमध्ये आयुष्य जगणं ही तशी तारेवरची कसरतच. पण, आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींना महत्त्वं देत ही तारेवरची कसरत करत आजवर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखला आहे. अशाच सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. ‘देसी गर्ल’, ‘क्वांटिको गर्ल’ अशा विविध नावांनी आपली ओळख प्रस्थापित करणारी ही अभिनेत्री सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

प्रियांका नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. त्यातीलच एक कारण म्हणजे तिची स्टाईल स्टेटमेंट. विविध कार्यक्रमांना मोठ्या ऐटीत येणारी प्रियांका नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पण, यासाठी तिला दिवसातून कमीत कमी पाच वेळा कपडे बदलावे लागतात. ही बाब सर्वसामान्य असली तरीही तितकी लक्षवेधी आहे. खुद्द प्रियांकाने ‘बाझार’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

आपल्यावर सतत कॅमेऱ्यांच्या नजरा रोखलेल्या असतात. त्यामुळे कोण कधी आपला फोटो काढू शकेल याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे प्रियांका फॅशन आणि तिच्या स्टाईल स्टेटमेंटविषयी नेहमीच सजग असते. त्याविषयीच सांगताना ती म्हणाली, ‘फॅशन हा माझ्या आयुष्याचा आणि माझ्या कामाचा एक अविभाज्य भाग आहे. दिवसभरात मी जवळपात पाच वेळा कपडे बदलते. रेड कार्पेटपासून, स्ट्रीट स्टाईल आणि विविध टेलिव्हिजन कार्यक्रमांसाठीच्या लूकचा त्यात समावेश असतो. माझ्या अवतीभोवती नेमहीच स्टायलिस्टचा गराडा असतो, जे सतत कलात्मक पद्धतीने काम करत असतात.’
‘बाझार’च्या नव्या सीरिजमधून प्रियांका तिच्या स्टाईलविषयी आणखीही बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. आता त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रियांकाचा हा अंदाज एकदा पाहाच.