24 February 2021

News Flash

ऑस्करविजेत्या चित्रपटातील अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी राधिका

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे

राधिका आपटे

अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आणखी एका कारणामुळे प्रकाशझोतात आली आहे. तिच्याविषयीच्या या चर्चा रंगण्यामागचे कारण आहे, ‘स्लमडॉग मिलियनेअर’ आणि ‘लायन’ चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता देव पटेल. राधिका येत्या काही दिवसांमध्ये या अभिनेत्यासोबत झळकणार आहे.

खुद्द राधिकानेच ‘मुंबई मिरर’शी बोलताना याविषयीची माहिती दिली. ‘होय… मी आणि देव एकाच चित्रपटात काम करणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाविषयीची अधिक माहिती आम्ही तुम्हाला सांगूच’, असे ती म्हणाली. ते दोघंही लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत.

मुख्य म्हणजे नेहमीच चौकटीबाहेरील कथानकांना न्याय देणारी राधिका पुन्हा एकदा त्याच मार्गावर जात असून, देवसोबतच्या चित्रपटाचे कथानकही थोडे वेगळेच असणार आहे. देव पटेलसोबत स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे राधिकाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे. तूर्तास या अभिनेत्रीने तिचे संपूर्ण लक्ष खिलाडी कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर केंद्रीत केले आहे. अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे अशी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

‘पॅडमॅन’मागोमागच राधिका ‘बाजार’ या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटासाठी सैफ अली खान, चित्रांगदा सिंग हे कलाकारही दिसणार आहेत. त्याव्यतिरिक्त अनुराग कश्यपच्या ‘लव्ह अँड लस्ट’ या लघुपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:56 am

Web Title: bollywood actress radhika apte trends because of oscar winning movie slumdog millionaire fame actor dev patel
Next Stories
1 फ्लॅशबॅक : ‘कुली’ पुन्हा ड्युटीवर…
2 दीपिका- रणवीर लग्न करण्याच्या तयारीत?
3 डिझेल इंजिन, सलमान आणि आनंद महिंद्रांचे मार्मिक ट्विट
Just Now!
X