बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकारा आहेत जे रुपेरी पडद्यापासून लांब असले तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींची माहिती चाहत्यांना देत असतात. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. लग्नानंतर समीराने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. पण तिला वाढत्या वजनामुळे नैराश्याचा सामना करावा लागल्याचे तिने सोशल मीडियावर उघडपणे सांगितले आणि ती पुन्हा चर्चेत आली. आता समीराने एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नृत्य करताना दिसत आहे.

समीराने नुकताच तिचा इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे समीराच्या सासू बाईंनी. सुरुवातीला समीरा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन डान्स करते आणि तिच्या सासूबाई मोबाईलमध्ये ते शूट करत असतात. नंतर तिच्या सासूबाई काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करतात आणि डान्स करतात. समीराच्या सासूबाईंचा या वयातील कूल डान्स सर्वांना प्रचंड आवडला आहे. त्या दोघी सासू-सुनांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत समीराने ‘फ्लिप द स्वीच’ असे कॅप्शन दिले आहे. त्याचबरोबर अनेक हॅशटॅग देखील वापरले आहेत.

 

View this post on Instagram

 

Flip the switch . #motherinlaw #indian #edition @manjrivarde #takefunseriously #thisishowwedoit #fliptheswitchchallenge

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

आणखी वाचा : फोटोग्राफरला वैतागला वरुण धवन, थेट पोलिसांना दिला आवाज

काय आहे ‘फ्लिप द स्वीच’ चॅलेंज?
खरतर समीराने सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘फ्लिप द स्विच चॅलेंज’ पूर्ण करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या चॅलेंजमध्ये व्हिडीओत दोन व्यक्ती असतात. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला डान्स करताना पाहते. नंतर तिच दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्ती सारखा डान्स करुन दाखवते.

समीराने २०१४ मध्ये बॉयफ्रेंड अक्षय वर्देशी लग्न केले. अनेक वर्षे एकमेकांना डेट करुन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर आठ महिन्यांतच समीराला दुसरी मुलगी झाली. समीरा बऱ्याच वेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.