दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला ‘चाची ४२०’ साऱ्यांच्याच लक्षात असेल. १९९७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये एका चिमुकलीने कमल हसन आणि तब्बू यांच्या मुलीची भारती रतन ही व्यक्तीरेखा साकारली होती. विशेष म्हणजे ही बालकलाकार दुसरी तिसरी कोणी नसून दंगल गर्ल फातिमा सना शेख आहे. फातिमाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

‘चाची ४२० ‘ हा चित्रपट त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात तब्बू आणि कमल हसनसोबत फातिमाचीही महत्वाची भूमिका होती. यामध्ये फातिमाने भारती रतन या बालकलाकाराची भूमिका वठविली होती. सध्या फातिमाने ‘चाची ४२०’ मधला एक फोटो शेअर केला असून ‘थ्रोबॅक’ असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. तिच्या या कॅप्शनमुळे फातिमानेच भारती रतनची भूमिका साकारली होती, हे स्पष्ट झालं आहे.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
aarti singh wedding rumors (1)
लाल साडी, केसात गजरा अन् घरी सजावट! गोविंदाच्या भाचीच्या लग्नाची तयारी सुरू, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

 

View this post on Instagram

 

#Throwback #chachi420 @tabutiful

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on


फातिमाने मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटामध्ये तिने कुस्तीपटू गीता फोगटची भूमिका साकारली होती. फातिमाच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर फातिमाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘चाची ४२०’ मुळे फेमस झालेल्या फातिमाने बालकलाकार म्हणून अभिनेत्री जुही चावलाच्या ‘वन टू का फोर’, ‘बिट्टू बॉस’ आणि ‘आकाशवाणी’ चित्रपटात देखील काम केले होते.