News Flash

VIDEO : राजकुमार राव, श्रद्धा कपूर ‘दिल से’ गातात तेव्हा

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावाच्या यादीत समाविष्ट होणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर. श्रद्धा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून, तिच्या आगामी चित्रपटाविषयी किंवा खासगी आयुष्यातील काही घडामोडींविषयी माहिती देत असते. पण, यासोबतच ती काही धमाल व्हिडिओसुद्धा पोस्ट करत असते. सध्या श्रद्धा कपूरने तिचा गातानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत शाहरुख खानवर चित्रीत करण्यात आलेलं एक अतिशय लोकप्रिय गाणं गात आहे.

गंभीर आणि प्रगल्भ विषयांवर आधारित चित्रपटांना प्राधान्य देणाऱ्या राजकुमार रावचा एक वेगळाच अंदाज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ‘दिल से…’ या गाण्याला श्रद्धा आणि राजकुमारने हटके पद्धतीने सादर केलं आहे. काही चाहत्यांना त्यांची ही गायनशैली पटणारही नाही. पण, मजामस्करीच्या वातावरणात त्यांनी दिल से गायलेलं हे गाणं काही जणांचं मनही जिंकत आहे.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

राजकुमार राव आणि श्रद्धा येत्या काळात ‘स्त्री’ या विनोदी भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भोपाळमध्ये सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. ‘स्त्री’च्या निमित्ताने राजकुमार आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असून, विनोदी भयपट साकारण्याची या दोघांची पहिलीच वेळ आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती राजकुमार निदीमोरु आणि कृष्णा डीके करणार आहेत. सध्या या चित्रपटासाठी श्रद्धा आणि राजकुमार बरीच मेहनत घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 4:10 pm

Web Title: bollywood actress shraddha kapoor and rajkummar rao singing dil se song from stree set
Next Stories
1 …जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ‘आई हूं यूपी-बिहार लूटने’ गाण्यावर थिरकते
2 बिग बींनी पुन्हा एकदा धरली दक्षिणेची वाट
3 VIDEO : वडीलच मुलाला वृद्धाश्रमात पाठवतात, असं कुठे असतं का?
Just Now!
X