17 December 2018

News Flash

सारा, जान्हवीमध्ये होणाऱ्या तुलनेविषयी श्रीदेवी म्हणते…

चित्रपटसृष्टीतील स्पर्धा कोणालाच चुकलेली नाही.

श्रीदेवी, जान्हवी कपूर, सारा अली खान

बॉलिवूडमध्ये आता बऱ्याच कलाकारांची मुलं आपल्या करिअरच्या अनुशंगाने तयारीला लागली आहेत. याच स्टार किड्समध्ये सध्या चर्चेत असणारी नावे म्हणजे सारा अली खान आणि जान्हवी कपूर. अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत असून, या दोघीही मोठ्या बॅनर्स अंतर्गत बनणाऱ्या चित्रपटांतून या कलाविश्वात पदार्पण करणार आहेत. सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर जान्हवीसुद्धा येत्या काही दिवसांमध्ये ‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी बरीच मेहनत घेणाऱ्या या दोन्ही अभिनेत्रींविषयी सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यात अनेकांनी तुलना करण्यासही सुरुवात केली आहे. आपल्या मुलीच्या पदार्पणापूर्वीच अशा प्रकारे तिची तुलना करण्याविषयी श्रीदेवीला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत ती म्हणाली, ‘चित्रपटसृष्टीत होणारी स्पर्धा कोणालाच चुकलेली नाही. त्यात वावगे असे काहीच नाही. कारण, याच स्पर्धात्मक वातावरणामुळे तुम्हाला आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. पण, या साऱ्यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मागे टाकून कोणी पुढे जाईल याची भीतीही तुमच्या मनात येता कामा नये.’

फोटो गॅलरी: childrens day 2017 : ..या प्रसिद्ध मराठी कलाकारांना ओळखलंत का?…

आपल्या मुलीच्या पदार्पणाविषयी श्रीदेवी बरीच सजग आहे. याविषयीच एका मुलाखतीत सांगताना श्रीदेवीने स्पष्ट केले होते, कोणत्याही आईच्या मनात आपल्या मुलांच्या करिअरवषयी ज्या प्रकारच्या भावना असतात अगदी तशाच भावना माझ्यही मनात आहेत. श्रीदेवी करण जोहरवर नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण, या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्यामुळेच ती करणवर नाराज असल्याचे म्हटले जात होते.

First Published on November 14, 2017 4:17 pm

Web Title: bollywood actress sridevi on comparison between jhanvi kapoor and sara ali khan