18 November 2017

News Flash

PHOTOS : निशाचा चेहरा का लपवतेय सनी?

डॅनियलनेही निशाची पूर्ण काळजी घेतली.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 3:23 PM

सनी लिओनी

‘बेबी डॉल’ सनी लिओनी नुकतीच नवी दिल्लीहून मुंबईत परतली. ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरचं अनावरण करण्यासाठी ती नवी दिल्लीला गेली होती. त्या कार्यक्रमानंतर तिने लगेचच मुंबईची वाट धरली. मुंबईत जेव्हा सनीचं आगमन झालं तेव्हा नेहमीप्रमाणेच तिची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी गर्दी केली. पण, यावेळी सनीपेक्षा तिच्या मुलीवरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या.

विमानतळातून बाहेर पडताना सनीसोबत तिचा पती डॅनियल वेबर आणि मुलगी निशा कौर वेबरही होते. निशाला डॅनियलने उचलून घेतलं होतं. तर सनीसुद्धा तिचा चेहरा छायाचित्रकारांपासून लपवत होती. निशाला दत्तक घेतल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सनीला सहकुटुंब पाहण्यात आलं. यावेळी ती आपल्या मुलीची काळजी घेतानाही दिसली. छायाचित्रकार आणि विमानतळावरील गर्दी पाहून आपली मुलगी घाबरू नये, यासाठी सनीने मोठ्या चतुराईने डॅनियलला तिचा चेहरा लपवण्यास सांगितल्याचं पाहायला मिळालं. डॅनियलनेही निशा त्या सर्व माहोलामध्ये गोंधळून जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.

बऱ्याच कामांमध्ये व्यग्र असणाऱ्या या दोघांनीही आपल्या मुलीलाही तितकच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे आता निशासुद्धा त्यांच्यासोबत चांगलीच रुळतेय. सनी आणि डॅनियल सध्या पालक म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीचा त्रास होवू नये, याकडे ते दोघंही जातीने लक्ष देत आहेत.

विविध कार्यक्रमांमध्येही सनीला तिच्या मुलीबद्दल काही प्रश्न विचारले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील लातूरमधून सनीने निशाला दत्तक घेतलं होतं. सुरुवातीला तिला आणि डॅनियलला भाषेमुळे निशासोबत संवाद साधण्यात काही अडचणी आल्या होत्या. पण, आता मात्र ती अडचणही दूर झाली असल्याचं सनीने एका चॅट शोमध्ये स्पष्ट केलं.

First Published on September 13, 2017 3:23 pm

Web Title: bollywood actress sunny leone keeps an eye on daughter nisha as she walks out of the airport with husband daniel weber see photos