हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट रसिकांकडून बायोपिकला चांगलीच पसंती दिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून खेळाडू म्हणू नका किंवा मग एखादा कलाकार. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. याच बायोपिकमध्ये आता आणखी एका रंजक कथेची भर पडली आहे. ती कथा आहे अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यावर भाष्य करणारी.
‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’, असं या बायोपिक वेब सीरिजचं नाव असून, त्यातून बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. खुदद सनीच या बायोपिकमध्ये झळकणार असून, तिचा प्रवास चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे. नुकतच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटातील तिच्या पतीच्या भूमिकेवरुन पडदा उचलला आहे. सनीच्या पोस्टनुसार मार्क बकनर हा दक्षिण आफ्रिकेचा अभिनेता सनीच्या बायोपिकमध्ये तिच्या पतीच्या म्हणजेच डॅनिअल वेबरच्या भूमिकेत दिसेल.
Dhadak : इशानही म्हणतो ‘आर्ची- परश्या’च सरस
दरम्यान, या बायोपिकमध्ये सनीच्या बालपणीची भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे. सनीनेच तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली होती. पॉर्न स्टार ते बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख करणारी सनी अनेकांसाठी नवी होती. पण, प्रेक्षकांनीही तिचा मोठ्या मनाने स्वीकार केला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत सनीने यश संपादन केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 12:46 pm