23 July 2019

News Flash

‘आमदार निवास’मध्ये थिरकणार सनी

'शांताबाई', या प्रचंड गाजलेल्या गाण्यावर ती ठेका धरणार असल्याच्या चर्चा आहेत.

सनी लिओनी

आमदार निवास असं म्हटलं की डोळ्यांसमोर अपेक्षित चित्र उभं राहतं ते म्हणजे नेतेमंडळी आणि राजकारणाचं. पण, आता याच आमदार निवासात अभिनेत्री सनी लिओनीला पाहता येणार आहे. मुख्य म्हणजे आमदार निवासात सनी करतेय तरी काय हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करुन गेला ना? आता या प्रश्नाचं उत्तर शोधत तर्कवितर्क लावून झाले असतील तर इथे लक्ष देण्याजोगी बाब आहे की, आमदार निवास नावाच्या आगामी चित्रपटातून सनी झळकणार आहे.

संजीव राठो़ड दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण अंधेरीमध्ये सुरु असल्याचं कळत आहे. दरम्यान, मराठी चित्रपटामध्ये सनी पुन्हा झळकणार असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याआधी सनीना ‘बॉईज’ या चित्रपटामध्ये ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यावर नृत्य सादर केलं होतं. त्यामुळे आता आमदार निवासमध्ये नेमकी ती कोणत्या गाण्यावर थिरकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

एबीपी माझाच्या वृत्तानुसार ‘शांताबाई’, या प्रचंड गाजलेल्या गाण्यावर ती ठेका धरणार आहे. यासाठी तिची वेशभूषाही अस्सल मराठमोळी ठेवण्यात आल्याचं कळत आहे.

First Published on September 11, 2018 4:05 pm

Web Title: bollywood actress sunny leone to dance in marathi movie aamdar nivas