25 September 2020

News Flash

अरे हा तर तैमुरच! अभिनेत्रीचा फोटो पाहून नेटकरी झाले अवाक्

ही अभिनेत्री लवकरच तेलुगु सुपरहिट 'आरएक्स १००' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. मात्र या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहिले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया. सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असलेली तारा अनेक वेळा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. त्यातच काही दिवसापूर्वी तिने तिच्या लहानपणीचे फोटो शेअर केले. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. इतकंच नाही तर काहींनी तिची तुलना तैमुरसोबतही केली.

ताराने इन्स्टाग्रामवर तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड क्युट दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी या फोटोचं कौतुक करत तिची तुलना करिना कपूर-खानचा लेक तैमुर यांच्यासोबत केली आहे.

 

View this post on Instagram

 

Cub/Pup

A post shared by TARA (@tarasutaria) on

 ताराचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला, लहानपणी ती तैमुर अली खानसारखी दिसत असल्याचंही म्हटलंय. तर काहींनी तिला पारलेजी गर्ल असंही म्हटलं आहे.

दरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इअर २’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तारा लवकरच तेलुगु सुपरहिट ‘आरएक्स १००’ या चित्रपटाच्या रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटातून सुनिल शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 3:37 pm

Web Title: bollywood actress tara sutaria shares her childhood picture ssj 93
Next Stories
1 गौरी खानने डिझाइन केला होता शाहरुखचा गाजलेला ‘बाजीगर’ लूक
2 ऑस्कर विजेता मेकअपमॅन ‘या’ भारतीय बायोपिकला देणार ‘गोल्डन टच’
3 ‘बिग बॉस’फेम आरोह वेलणकरची पूरग्रस्तांना आर्थिक मदत
Just Now!
X